मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाहू वाचनालयात वृक्षारोपण

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील राजर्षी शाहू नगर वाचन मंदिरामध्ये देशी वाणांची वृक्ष लागवड वाचनालयाचे संचालक आप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे कार्यवाह धनाजीराव जाधव हे होते.

राज्यात गेली कांही वर्षे सातत्याने होणारी दुष्काळी परिस्थिती तसेच अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटग्रस्त झाला आहे.निसर्गाचा झालेला ऱ्हास व परिणामी वसुधंरेचा ढासळलेला समतोल दुरुस्त करून वसुंधरेला सुचलाम सुफलाम करणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.यासाठी राज्याचे मंञी चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाचनालयाच्या वतीने देशी वाणांची लागवड करण्यात आली आहे.

 

 

या कार्यक्रमास वाचनालयाचे संचालक नानासाहेब जाधव, दिगंबर जाधव, खंडेराव हेरवाडे, दिलीप मोरे, ग्रंथपाल संभाजी चव्हाण, सहाय्यक ग्रंथपाल रुपाली कुंभार यांच्यासह वाचक हितचिंतक उपस्थित होते.

error: Content is protected !!