पुलाची शिरोली हद्दीतील अतिक्रमण कायम करणे
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली पुलाची हद्दीतील महाडिक वसाहत बहुरूपी वसाहत रेणुका नगर येथील अतिक्रमण कायम करण्यासाठी ग्रामपंचायत शिरोली पुलाची लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णात करपे यांनी तसेच त्यांचे सहकारी सदस्यांनी प्रांताधिकारी इचलकरंजी व हातकणंगले तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केले आहे. या वसाहतीत मधील गरीब व गरजू लोक पूर्वीपासून राहत असून त्यांना शासन नियमानुसार हक्काची घर असणे आवश्यक आहे.तरी सदर जागेचे पंचनामे करून सदर लोकांना हक्काचे घर मिळण्याकरता शासन परिपत्रका नुसार अतिक्रमण कायम होणे बाबत निवेदनात म्हटले असून सदरचे निवेदन लोकनियुक्त सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे,ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, विजय जाधव, ग्रामपंचायत प्रतिनिधी दीपक यादव, योगेश खवरे, सागर कौंदाडे, दिलीप तेलवकर,एन डी पाटील, बबन सनदे, विजय यादव, तिपेश कोंडपल्ली
यांच्या उपस्थित देण्यात आले.