शिरोळ ते वीजबोर्ड रस्त्यावर चिखलामुळे झाली घसरगुंडी
वाहनधारकांच्या जीवितास धोका त्वरित रस्ता करण्याची मागणी
शिरोळ / प्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शिरोळ ते वीज बोर्ड ते शिरटी या दरम्यानच्या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली असून काही कारणास्तव हे काम रखडल्याने या रस्त्यावर खडीकरण करून मलमा टाकल्याने रस्त्यावर चिखल होऊन अनेक वाहने घसरून पडत असल्याचे चित्र या मार्गावर पाहायला मिळत आहे यामुळे अनेक दुचाकीस्वरांचा जीविकास धोका निर्माण झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या परिसरातील जनतेतून तीव्र स्वरूपात संताप व्यक्त होत असून तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी जोर धरित आहे
शिरोळ ते महावीर नगर वीज बोर्ड ते शिरटी या दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती यामुळे वाहनधारकांना आपली वाहने जीव मुठीत धरून चालवावी लागत होते येथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता यामुळे हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी शिरटी ग्रामस्थांनी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेत रास्ता रोखो आंदोलन केले यामुळे शासनाकडून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला निधी मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता व टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर येथील रस्त्याच्या कामाच्या ठेकेदारांनी कामास सुरुवात केली पण काही कारणास्तव या रस्त्याचे काम रेंगाळले आहे पावसाळ्यात सुरुवात होण्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि ठेकेदाराने कामाकडे फिरवलेली पाठ यामुळे गेल्या काही दिवसापासून या रस्त्याचे काम रेंगाळले आहे हे काम त्वरित व्हावे यासाठी आंदोलन अंकुशने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता काही दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले होते पण अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही रस्त्यावर केवळ खडीकरण करून त्यावर मुरूम वजा मलमा टाकण्यात आल्यामुळे मान्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल झाला आहे चिखलातून दुचाकी वाहन चालवत असताना वाहने घसरून छोटे-मोठे अपघात घडून अनेक नागरिकांना इजा होत आहे यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ होणे गरजेचे आहे
पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे होते रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविषयी जनतेतून तीव्र स्वरूपात संताप व्यक्त होत आहे तसेच वाहनधारक व संतप्त नागरिकांकडून चला शिरोळ वीज बोर्ड रस्त्यावर घसरगुंडी खेळायला असा उपरोधिक टोला सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला जात आहे
यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याचे काम पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीस सुलभ करावा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात घालवाड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे