लायन्स क्लब ऑफ शिरोळच्या अध्यक्षपदी बुधाजी चुडमुंगे,सचिवपदी अमोल देशमुख यांची निवड

Spread the love

लायन्स क्लब ऑफ शिरोळच्या अध्यक्षपदी बुधाजी चुडमुंगे सचिवपदी अमोल देशमुख यांची निवड

शिरोळ / प्रतिनिधी

 

सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जागतिक सामाजिक संस्थेच्या लायन्स क्लब ऑफ शिरोळच्या अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते बुधाजी चुडमुंगे यांची तर सचिवपदी अमोल देशमुख,खजिनदारपदी अभिजीत गुरव आणि उपाध्यक्षपदी रामप्रसाद पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

 

लायन्स क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि झोनचेअरमन सचिन माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीकरता सदस्यांची विशेष बैठक पार पडली.या बैठकीत लायन्स क्लब ऑफ शिरोळच्या

 

 

अध्यक्षपदी ला. बुधाजी चुडमुंगे यांची एकमताने निवड करण्यात आली सचिव पदी ला.अमोल देशमुख, खजिनदारपदी ला.अभिजीत गुरव,उपाध्यक्षपदी ला. रामप्रसाद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध विधायक व सामाजिक उपक्रम राबवून शिरोळच्या वैभवात व नावलौकिकात भर घालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल असे आश्वासन नूतन अध्यक्ष ला.बुधाजी चुडमुंगे यांनी यावेळी दिले.लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शपथविधी सोहळा आयोजित केला जाणार आहे.

 

या बैठकीस लायन्स क्लबचे सदस्य किशोर पाटील रेंदाळकर,सनीसिंग पाटील,भास्कर पाटील,प्रवीण चौगुले, प्रसन्न पाटील, महेश मोरे,अजित गतारे,संदीप रायान्नावर, भालचंद्र सासणे,सर्जेराव पाटील,युवराज पाटील, बारवाडकर,

 

अभिजीत माने, शेखर पाटील बारवाडकर,प्रतापसिंह पाटील, डॉ विशाल चौगुले, डॉ सुशांत पाटील, डॉ राहुल खोत, डॉ रवींद्र भोसले, डॉ कोठीगीरे, ऍड बागडी यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!