ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एच एम टी फाटा येथे ट्रेलरची दुचाकीस धडक बसून दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला .हा आपघात आज बुधवारी दुपारी १२ :३० वाजण्यासुमार झाला.अपघात मयत झालेल्या तरूणाचे नाव आरिफ महंमद हिसाख बेपारी ( वय २५ रा सदर बाजार कोल्हापूर) असे असून आसिफ आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच ०९ ए टी ७८६९ ने शिरोली औद्योगिक वसाहत येथील एच एम टी फाटा ब्रीज पास करून औद्योगिक वसाहतीमध्ये जात असताना पुण्याच्या दिशेने झाणार्या ट्रेलर क्रमांक आर जे ०६ जे डी ८८५६ ने त्याला धडक दिल्याने ट्रेलरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आरिफ हा गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामास होता तो कामानिमित्त शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये आला असताना हा अपघात झाला या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.