संजय शिंदे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा केली शैक्षणिक कार्यास मदत
शिरोळ : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे अध्यक्ष आणि उद्योजक संजय तुकाराम शिंदे यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून अनावश्यक खर्चाला फाटा देत शिरोळ परिसरातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी अर्थसहाय करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
शिरोळ परिसरातील अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रांचे पूर्तता करिता आवश्यक असणारे जातीचा उत्पन्नाचा नॅशनॅलिटी डोमेशियल यासह विविध दाखले वेळेत मिळावेत,यासाठी आवश्यक
असणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करून ते दाखले काढण्यासाठी लागणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अर्थसाह्य करून दाखले काढण्यासाठी व शैक्षणिक प्रवेशासाठी मदत करण्याची भूमिका उद्योजक आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे यांनी
घेतली.यासाठी त्यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून अनावश्यक खर्चाला फाटा दिला आणि हा उपक्रम राबविला या कामी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य पत्रकार चंद्रकांत भाट यांनी सहकार्य करत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले
उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.या कार्याबद्दल आणि वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब हेरिटेज सिटीच्या सर्व सदस्यांनी श्री शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.