खंडेराव हेरवाडे शाहू ग्रंथालय मित्र पुरस्काराने सन्मानित

Spread the love

राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांचा सन्मान

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील राजर्षी शाहू नगर वाचन मंदिराच्या 146 व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा शाहू ग्रंथालय मित्र पुरस्कार येथील सामाजिक कार्यकर्ते खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे यांना सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश जडे यांच्या हस्ते देण्यात आला.

 

राजर्षी शाहू नगर वाचनालयाच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.शिरोळ नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मानपत्र सन्मानचिन्ह कोल्हापुरी फेटा शाल श्रीफळ देऊन खंडेराव हेरवाडे सहपत्नीक सन्मानित करण्यात आले.

 

आत्मसन्मान गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार चंद्रकांत भाट,बाळासाहेब कांबळे, राष्ट्रीय आदर्श शिक्षका पुरस्कार मिळाल्याबद्दल वाचनालयाच्या संचालिका सौ जयश्री पाटील वाढदिवसानिमित्त वाचनालयाचे संचालक डॉ आप्पासाहेब पुजारी अशोक गंगधर यांचाही वाचनालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.

 

वाचनालयाचे अध्यक्ष आण्णासाहेब माने गावडे यांनी स्वागत केले.संचालक आनंदराव माने देशमुख यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये वाचनालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तर समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रकाश जडे व सौ स्मिता जडे यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन केले.

 

 

पुरस्कार दिल्याबद्दल खंडेराव हेरवाडे यांनी मनोगतामधून सर्वांचे आभार मानले.या समारंभास माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील,दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे,वाचनालयाचे उपाध्यक्ष एम एस माने, कार्यवाहक धनाजीराव जाधव,

 

 

संचालक पंडित काळे, एन वाय जाधव,रामचंद्र पाटील, शहाजहान शेख, विजयसिंह माने-देशमुख,वाचनालयाचे
ग्रंथपाल संभाजी चव्हाण, सहाय्यक ग्रंथपाल रूपाली कुंभार, लिपिक बाबुराव मोरे, ऍड श्रीकांत माळकर, रावसाहेब पाटील-मलिकवाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील

 

मान्यवर वाचनालयाचे सभासद वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाचनालयाचे संचालक व उद्योगपती सचिन माळी यांनी आभार मानले.सूत्रसंचालन पाहुण्यांची ओळख आणि मानपत्राचे वाचन संचालिका सौ जयश्री पाटील यांनी केले.

error: Content is protected !!