पुलाची शिरोली येथील राष्ट्रसेवा प्रशालेचा १०० टक्के निकाला ची परंपरा कायम

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील राष्ट्रसेवा प्रशालेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. हि परंपरा कायम राखण्यात शिक्षक व विद्यार्थ्यांना यश आले आहे. या शाळेची विद्यार्थिनी कुमारी राधा खरसकर ही ९३.८० टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम आली आहे.शाळेचा अन्य निकाल पुढीलप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यम राधा खरसकर ९६.६० प्रथम कीर्ती जुजार ९१.६० द्वितीय अनुष्का मोरे ९०.४० तृतीय. मराठी माध्यम स्नेहा सुतार ८९.२० प्रथम, पियुष कांबळे ८८.२० द्वितीय, श्रावणी बुरुड ८८ तृतीय. या शाळेचे एकूण ११४ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अध्यापक चंद्रकांत कुंभार, एस.पी. चौगुले मुख्याध्यापक सुभाष पाटील व शिक्षक वर्ग आणि पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.राष्ट्रसेवा प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागल्यामुळे शिरोली आणि परिसरातून मार्गदर्शक शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

error: Content is protected !!