डॉ.अप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील इनस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजला मान्यता – गणपतराव पाटील 

Spread the love
या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मिळणार डिग्री इंजिनिअरिंगचे शिक्षण
शिरोळ / प्रतिनिधी
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चारिटेबल ट्रस्ट संचलित पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये नवीन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यास शासनाकडून मान्यता मिळाल्याने डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील इनस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सन 2024 -25 सालापासून इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक वर्षात सुरुवात होणार आहे अशी माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन व सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी गणपतराव पाटील बोलताना पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना उच्च शिक्षण जवळच्याजवळ आणि अत्यल्प फीमध्ये मिळावे हे स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील साहेबांचे स्वप्न होते व त्याची परिपूर्ती म्हणून आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील इन्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डीग्री ) कॉलेजला मान्यता मिळाली यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळणार आहे.
 श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सभासद व परिसरातील ग्रामीण होतकरू व हुशार विद्यार्थ्यासाठी टेक्निकल संस्था सुरू करताना आय.टी.आय. व पॉलिटेक्निकबरोबरच डिग्री कॉलेज सुरु करणे हे डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांचे स्वप्न होते.हे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे.
डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या प्रेरणेतून श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत 2010 साली सुरू असलेल्या पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्सबरोबरच नवीन डिग्री इंजिनियरींग कॉलेज शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सुरू करीत आहोत.सदर शैक्षणिक संकुलाचे नाव डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील इनस्टीट्यूट ऑफ टेकनॉलॉजी असे आहे.
डिग्री अंतर्गत अनुक्रमे 1) कॉम्प्युटर सायन्स व  इंजिनिअरिंग. 60, 2) इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग.- 60, 3) इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. 60, 4) मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60
पॉलिटेक्निक अंतर्गत अनुक्रमे
1 ) सिव्हील इंजिनिअर. 60, 2) कॉम्प्युटर . 90, 3) इलेक्ट्रिकल इंजिनिअर 90, 4) मेकॅनिकल इंजिनिअर. 60 हे कोर्सेस उपलब्ध आहेत. सदरचे डिग्री कॉलेज व पॉलिटेक्निक कॉलेज हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे मान्यता प्राप्त आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना उच्च शिक्षण जवळच्या जवळ मिळावे व अत्यल्प फीमध्ये सदरचे उच्च शिक्षण मिळावे हे स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील साहेबांचे स्वप्न होते व त्याची परिपूर्ती श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांनी केली.
हे नवीन डिग्री कॉलेज सूरु करणेसाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ऑडिट टेबल ट्रस्टचे एक्स ऑफिसीओ ट्रस्टी एम.व्ही.पाटील, ट्रस्टचे संचालक ए.एम.नानिवडेकर व सर्व संचालक मंडळ यांचे सर्वतोपरी कुशल मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी शिक्षण संस्थेचे प्राचार्य पी आर.पाटील, सर्व विभागप्रमुख एन.बी.भोळे, एस.पी.चव्हाण, पी.बी. पाटील,ए.ई.पाटील.ए.टी.पाटील,पी.एम.कुंभार,एन.एन. कुलकर्णी सुभाष धुमे यांच्यासह मान्यवर काय उपस्थित होते या कॉलेजमध्ये सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सवलती उपलब्ध आहेत.
तसेच विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणे व स्वयंरोजगार करणेसाठी सर्वतोपरी मार्गदर्शन देण्यासाठी कॉलेजमध्ये अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक वृंद सदैव कार्यरत असतो. एक विद्यार्थी, एक संगणक आणि 300 Mbps ची Lease line (इंटरनेट) ची व्यवस्था आहे.
सर्व सोयीनियुक्त व सुसज्ज असे हॉस्टेल, वर्ग व प्रयोगशाळा आहेत.प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती करीता ट्रेनिंग डिपार्टमेंट, प्लेसमेंट डिपार्टमेंट, डिपार्टमेंटल असोसियशन्स, टेक्निकल क्लब यासारखे नाविन्यपूर्व उपक्रम राबविण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करुन आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे .
error: Content is protected !!