किरण पाटील (कणंगलेकर) यांचे निधन
शिरोळ / प्रतिनिधी
येथील सामाजिक कार्यकर्ते व शिरोळ तालुका युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किरण रावसाहेब पाटील (कणंगलेकर) यांचे मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी वयाच्या 45 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी सकाळी 8 वाजता शिरोळ येथील पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम येथे होणार आहे