कुरुंदवाड / प्रतिनिधी
कुरुंदवाड दरम्यानच्या नृसिंहवाडी रस्त्यावरील अज्ञात चारचाकीने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. शुभम शशिकांत केरीफळे वय 25 अखिलेश महावीर मुळे वय 30 दोघे रा.शेडशाळ, ता.शिरोळ) असे जखमींची नावे आहेत.हा अपघात सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुभम केरीपाळे व त्याचा मित्र अखिलेश मोळे हे दोघेजण आपल्या ताब्यातील दुचाकी हिरो सुपर स्प्लेंडर क्र.(एम.एच.09 बी.डब्ल्यू.6587)वरून कुरुंदवाड मधील काम आटोपून गावी शेडशाळकडे जात असताना सलगर सदलगा महामार्गावर जैन संस्कृतिक भवन समोर नृसिहवाडीहून कुरुंदवाडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी स्विफ्टने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली.त्यानंतर चारचाकीने घटनास्थळावरून पळ काढला.
या अपघातात शुभम केरीपाळे हा गंभीर जखमी झाला आहे.त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर त्याचा मित्र अखिलेश मुळे हा किरकोळ जखमी झाल्याने त्याला कुरुंदवाड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघाताची फिर्याद आनंदराव कुमे यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे.अपघात करून पळ काढलेल्या चार चाकी वाहनाचा रात्री उशिरा पोलीस शोध घेत होते.