कुरुंदवाड जबरी चोरीतील चोरटे 24 तासात जेरबंद

Spread the love

कुरुंदवाड : प्रतिनिधी

 

येथील माळभागावरील भरवस्तीत मुक्ताई कॉम्प्लेक्स मध्ये महिलेचे तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी देऊन 1लाख,11 हजाराच्या मुद्देमालाची जबरी चोरी केले प्रकरणी घटनास्थळा शेजारील 2 मुख्य सुत्रधारासह 3 चोरटे अशा 5 संशयितांना कुरुंदवाड पोलिसांनी 24 तासात मुसक्या आवळत जेरबंद केले आहे.

 

 

त्यांच्याकडून 1 दुचाकी व चोरीचा मुद्देमान जप्त करण्यात आला आहे.मुख्य सूत्रधार सुशांत कल्लया जंगम (वय.40)सुनील अशोकसिंग रजपूत (दोघे.रा.कुरुंदवाड) प्रथमेश उर्फ गणेश शिवाजी गोरे(वय.23), प्रज्वल महादेव कोळी(वय.20),धीरज संजय कोळी(वय.19,तिघे रा.टाकळीवाडी,ता.शिरोळ)अशी त्यांची नावे असल्याची माहिती इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे,सपोनि रविराज फडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

दरम्यान संशयित आरोपींना येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात उभे केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.येथील महाराणा प्रताप उद्यानासमोर मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट नंबर तीन मधील राजेंद्र कापसे यांच्या राहत्या घरात त्यांचा पुणे येथे राहत असलेला मुलगा आशिषचे मित्र असल्याचे सांगून 3 चोरट्यांनी प्रवेश करून सुनिता

 

कापसे या घरी एकट्याच असल्याने त्यांचे तोंड दाबून दोन तोळ्याची चेन तिजोरीतील रोख रक्कम व दोन मोबाईल संच असा 1 लाख 11 हजाराच्या मुद्देमालाची जबरी चोरी केली होती.माहीती देताना ते पुढे म्हणाले यातील मुख्य सूत्रधार जंगम हा कॉम्प्लेक्स मध्ये कापसे यांच्या फ्लॅट समोरच भाड्याने राहतो कापसे यांच्या कुटुंबीयांची इत्तम-भूत माहिती जंगम याला असल्याने त्याने रजपूत या मित्राच्या मदतीने हा चोरीचा कट रचला.

 

 

ही जबरी चोरी करण्यासाठी या तिघांना समावेश करून घेऊन यांच्यातर्फे ही चोरी घडवून आणली आहे. पोलिसांनी आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांची छायाचित्रे संकलित झाली.त्यानुसार संशयित आरोपी प्रथमेश उर्फ गणेश गोरे,प्रज्वल कोळी,धीरज कोळी हे तिघे मिरज तालुक्यातील नरवाड येथे असल्याची माहिती मिळताच शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.

 

 

त्यांच्याकडून चोरीचे दागिने व मुद्देमाल जप्त करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी क्र.(एम एच 09.बी.जे 3593)ही जप्त करण्यात आली आहे.त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच या चोरीचे प्लॅनर जंगम आणि रजपूत यांची नावे निष्पन्न झाली. त्यांना रविवार रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.

 

 

यातील संशयित आरोपी गोरे याच्यावरती कर्नाटक राज्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत हा सराईत चोरटा असल्याचे सांगितले.संशयितांना जेरबंद करण्यासाठी सागर खाडे, शिरीष कांबळे,फारुख जमादार,विवेक कराडे, नागेश केरीपाळे हे पोलीस कर्मचारी होते.

error: Content is protected !!