कुरुंदवाड / प्रतिनिधी
राजापूर (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीवरील बंधार्याचे सर्वच बर्गे बसवून 14 फूट पाण्याची लेवल करण्यात आली आहे. पंधरा दिवसात झालेल्या वळवाच्या पावसाने शेतीचा पाणी उपसा बंद आहे.
त्यामुळे पाणी पातळी 16 फूट होऊन रविवारी दुपारी बारा वाजता ऐन उन्हाळयात बंधारा ओव्हरफ्लो होऊन बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे.दरम्यान गेल्या वर्षी अशीच परिस्थिती निर्माण होऊन बंधारावरून झाला होता.
यावर्षी दुसऱ्यांदा बंधारा ओव्हर फ्लो होऊन कर्नाटकच्या दिशेने पाणी वाहत चालले असून पाण्याची चातकासारखी वाट पाहणार्या कर्नाटकातील गावांना दिलासा मिळाला आहे. तर बंधाऱ्यावरील संरक्षणासाठी असलेल्या पोलिस व पाटबंधारे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला आहे.
राजापूर ता.शिरोळ हा कृष्णानदीवरील महाराष्ट्राचा शेवटचा बंधारा असून शिरोळ तालुक्यासाठी वरदायी आहे.या बंधार्याच्या बॅकवॉटरमुळे जवळपास शिरोळ तालुक्याची शेती व पिण्याच्या पाण्याची तहान भागते. कर्नाटकाला त्यांच्या मागणीनुसार प्रत्येक वर्षी या
बंधाऱ्यातून उन्हाळ्यात सुमारे २ टीएमसी पाणी देण्यात येते. मात्र यंदा कमी पावसामुळे पाण्याची टंचाई गृहीत धरुन बंधार्याचे सर्व बरगे घालण्यात आले आहेत.
15 दिवसात तीनवेळा वळीव जोरदारपणे बरसल्याने शेतीच्या पाण्याचा उपसा झाला नाही.
त्यामुळे पाण्याची बचत झाल्याने नदीतील पाणीपातळी 16 फूटावर गेली आहे.रविवारी बंधार्यावरुन पाणी ओव्हरफ्लो होवून कर्नाटकाच्या दिशेने वाहु लागले आहे.
450 क्यूसेक्सने पाण्याचा कर्नाटकात विसर्ग होत आहे.बंधाऱ्यावरील वाहतूक सुरू करण्यासाठी चार दरवाजाचे 1 फुटाने बर्गे काढणार असल्याचे पाटबंधारे अभियंता रोहित दानोळे यांनी सांगितले.