नागाव येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे थाटात उद्घाटन

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

नागाव ता.हातकणंगले येथील सिद्धार्थ क्रीडा,शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळातर्फे सुरू असलेल्या ४५ किलो वजनी गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन व्हर्साटाईल ग्रुपच्या संचालिका बिनाताई जानवाडकर,नँट फौड्रीच्या संचालिका आशा जैन यांच्या हस्ते करण्यात आला तर ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन अध्यक्षस्थानी होते.यावेळी जांभळी क्रिडा मंडळ व साई क्रिडा मंडळ कोरोची यांच्यात झाला यावेळी साई क्रिडा मंडळ कोरोची संघ विजयी झाला.
नागांव ता. हातकणंगले येथील  डाँ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ४५ किलो वजन गटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आज शनिवार पासून सुरू झाल्या यावेळी सहभागी झालेल्या जिल्ह्यातील विविध संघात चुरशीचे सामने झाले यावेळी प्रथम सामना महिला संघ जांभळी क्रिडा मंडळ व साई क्रिडा मंडळ कोरोची यांच्यात पार पडला.
यावेळी साई क्रिडा मंडळ कोरोची ३७ व जांभळी क्रिडा मंडळ ३२ असे दोन्ही संघानी गुण प्राप्त केले यावेळी कोरोची संघाने ५ गुणाने हा सामना विजयी झाले.महिलांचा सामना बघण्यासाठी कबड्डी शौकीनानी उस्फूर्ता दाखवून महिला संघास प्रोचाहन दिले.
यावेळी नागांव लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे,उपसरपंच सुधीर उर्फ बंटी पाटील,माजी उपसरपंच,शिये सरपंच शितल मगदूम,उमाशंकर कोळी,दलित मित्र अशोकराव माने,अनिल शिंदे,भिकाजी बाचणे,संजय वडार,भरत पाटील,उद्योजक राजू पाटील,योगेश रेळेकर,
प्रसाद कळंबेकर,सतिश लंबे,अशोक मगदूम आदिसह उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुंभार यानी केले .
error: Content is protected !!