नागाव येथे आजपासून रंगणार राज्यस्तरीय कबड्डीचा थरार

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळातर्फे ४५ किलो गटात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धां पुरुष व महिला गटात होत आहेत.शनिवारी, २५ व रविवारी २६ रोजी नागाव येथील डॉ. आंबेडकर नगरमधील सिद्धार्थ क्रिडांगणावर स्पर्धा होत आहेत.व्हर्साटाईल ग्रुपच्या संचालिका बिना जानवाडकर,ग्नँट फौड्रीच्या संचालिका शा जैन यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळीस्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी स्मँकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन आहेत. स्पर्धेतील विजेत्यास १५ हजार रुपये, चषक, उपविजेत्यास १० हजार रुपये रोख, चषक आणि तृतीय क्रमांकास ७ हजार रुपये व चषक असे बक्षीस आहे.संघांनी स्वप्नील राजाध्यक्ष व जीवन कांबळेंकडे नोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी केले आहे.

error: Content is protected !!