महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल,जयसिंगपूर संभाजीनगर मध्ये कृष्णात डोने महाराज यांची भाकणूक

Spread the love

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईलजयसिंगपूर संभाजीनगर मध्ये कृष्णात डोने महाराज यांची भाकणूक

जयसिंगपूर / प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, छोटे पक्ष आघाडी घेतील, चालता-बोलता मनुष्याला मरण येईल,आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघेल, समाजा समाजात भांडणं लावतील, सर्व जाती आरक्षणासाठी आंदोलन करतील, सांभाळून राहा ज्याच्या अंगावर भंडारा पडेल त्याच्या सर्व व्याधी दूर होतील
अशी भाकणूक कृष्णात डोणे-वाघापूरकर यांनी केली.
येथील संभाजीनगरात संत सद्गुरु भंडारा उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कृष्णात ढोणे महाराज यांनी भाकणूक केली. गांधी चौकापासून दिव्य स्वरूपात सुरू झालेल्या पालखी मिरवणुकीत शिरोळ तालुका परिसरातील सामाजिक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह भाविक व संभाजीनगर मधील महिला डोक्यावर आंबिलची घागर घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या पालखी मिरवणुकीत डीजे लेसर शो लेझीम हलगी धनगरी ढोल चौका चौकामध्ये रांगोळी फटाक्यांची आतिषबाजी सह भंडाराच्या उधळीने संपूर्ण वातावरण भक्तीमय बनले होते.संभाजीनगर येथे कार्यक्रम ठिकाणी पालखी मिरवणूक पोहोचल्यानंतर श्री अभिषेक भाकणूक आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.बाळू मामा भंडारा उत्सव कमिटिचे अध्यक्ष सरदार कांरडे , उपाध्यक्ष आरुण लाडवडे , खजिनदार बाळासाहेब गावडे , कार्याअध्यक्ष शेखर गाडेकर , सेक्रटरी सर्जेराव भंडारे , सल्लागार बाळू सकट , सचिव सचिण देसाई , अमर माने , योगेश सरवदे , रतन हडपद , यशवंत पवार , मानतेश लंब्बूगोळ , नितिन देसाई , अजित पवार , शंभूराजे हजारे , संतोष काळे व स्वनिल काळे यांच्या पुढाकाराने व विनायक गायकवाड , सूरज गाडीवडर , अभिषेक भंडारे , सौरभ तिवडे, सूनिल खांडेकर , सूरज आवळे , राहूल आवळे , सूमित गायकवाड , सोहेल सय्यद , सिध्दार्थ कोरे , श्रावण काळे , गूरु सकट , पवन भंडारे , सूशांत भंडारे , निखिल वारे दिपक सकट , दिनेश सकट व एबीएस मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या नियोजनात केले होते.

error: Content is protected !!