पद्माराजे विद्यालयात शालेय जीवनातील आठवणींना उजाळा

Spread the love

रयत शिक्षण संस्थेच्या श्री पद्माराजे विद्यालय शिरोळ येथील दहावी अ, ब, क, ड 2005 – 06 सालच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न शिरोळ येथील समर्थ मंगल कार्यालय येथे शालेय जीवनातील

 

आठवणी जाग्या करण्यासाठी शनिवारी पद्माराजे शाळेतील 2005 – 06 सालातील सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता.यावेळी सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक एकत्र आले व शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला.

 

सुरुवातीला सर्व विद्यार्थी मिळून सकाळी शाळेला भेट देऊन तिथून सर्वजण मिळून समर्थ मंगल कार्यालय इथे हलगीच्या तालात व दुचाकीच्या रॅलीद्वारे मोठ्या जल्लोषात निघाले.

 

प्रथम उपस्थित शिक्षकांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटोचे पूजन,दीपप्रज्वलन,राष्ट्रगीत,मयत झालेल्या विद्यार्थी व शिक्षक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनतर सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपली ओळख व मनोगते व्यक्त केली आणि आपल्या शालेय जीवनातील आठवणी जाग्या केल्या व सर्वांनी एकत्र मिळून स्नेहभोजनाचा आनंद लुटला.

 

तसेच स्नेहमेळाव्यात मनोरंजक खेळ खेळण्यात आले. इथून पुढच्या काळात फक्त आठवणीत न राहता सर्वजण एकमेकांच्या सुख दुःखात सुध्दा सहभागी होण्याची भावना देखील सर्वांनी व्यक्त केली.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक,माजी विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!