शिरोली गावातील बेकायदेशीर परप्रांतीय भाडेकरूची कागदपत्रे तपासा हिंदुत्ववादी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

Spread the love

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे

 

शिरोली ही औद्योगिक वसाहत असल्याने येथे अनेक राज्यातून परप्रांतीय कामगार आहेत.या कामगारांना भाडेतत्त्वावरती खोल्या दिल्या जातात.पण जादा पैशाच्या हव्यासापोटी खोली मालक कोणत्याही भाडेकरूची आयडी प्रूफ घेत नाहीत किंवा कोणतीही माहिती त्यांना नसते त्यामुळे कोण कोठून आला आहे.

 

त्याचा बॅकग्राऊंड काय ? याची पडताळणी न करता खोली भाड्याने दिली जाते व अनुचित प्रकार घडल्यानंतर आम्हास काही माहिती नाही आयडी प्रूफ किंवा त्याची काही माहिती आहे का असे विचारल्यास आम्हास कोणती माहिती नाही आयडी प्रूफ घेतलेला नाही असे म्हणून खोली मालक हात झटकतात.

 

यामुळे शिरोली गावचे नाव बदनाम होत त्यामुळे गावची शांतता भंग होऊ नये यासाठी आज सोमवारी पुलाची शिरोली येथील प्रशांत कागले यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने शिरोली ग्रामपंचायत यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदन ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम यांनी स्वीकारले.

 

 

यावेळी कृष्णात करपे,दीपक यादव,हिदाईत पटेल प्रमुख उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की शिरोली गावात औ‌द्योगिक वसाहत असलेने अनेक परप्रांतीय भाडेतत्त्वावर रहातात,पण त्यांची माहिती दिली जात नाही दोन दिवसांपूर्वी एका हिंदु गरीब कुटुंबातील लहान मुलगीला काम देतो म्हणून कोल्हापूर शिरोलीला आणून तिच्याशी अतिप्रसंग करणेचा प्रकार घडला,

 

 

याचबरोबर शेजारीच 2023 जानेवारी ला गांधीनगर येथे दहशतवादी पथकाने दोन बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले. कोल्हापूरात हमिदा बेगम व खुशी शेख या बांग्लादेशी घुसखोर महिलांना बनावट आधार कार्ड घेऊन फिरत असताना सोलापूर दहशतवादी पथकाने पकडणेत आले.

 

 

पुणे येथे पकडण्यात आलेले दहशतवादी यांनी कोल्हापूर आंबोली,चांदोली येथील रेखी केल्याचे समजते, याकारणाने दहशतवादी पथकाच्या रडारवर कोल्हापूर जिल्हा दिसत असून अशा वारंवार घटना होत आहेत.

 

म्हणून शिरोली गावात असे बाहेरून येऊन चुकीचा प्रकार घडू नयेत गावची शांतता सुव्यवस्था सुरक्षित रहावी यासाठी शिरोली ग्रामपंचायत प्रशासनाने यावर योग्य पाऊले उचलावी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनावर संदीप पोलॅकट, प्रमोद पाटील,संतोष माने,निवास पाटील,दिलीप तेलवेकर,ऋषिकेश सरनोबत, सतीश पाटील आदींच्या सह्या आहेत.यावेळी हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!