शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील प्रभाग क्र. ७ मधील राजमाता जिजाऊ नगर परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण व भुयारी गटारी कराव्यात अशा मागणीचे निवेदन बहुजन क्रांती दलाच्या वतीने शिरोळ पालिकेचे प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे यांना देण्यात आले आहे
येथील राजमाता जिजाऊ नगर मधील (मांग गारूडी समाज वस्ती) मधील भुयारी गटारीचा व रस्त्याचा प्रश्न बन्याच दिवसापासून प्रलंबित आहे. तरी या नागरी वस्तीमधील ही गटार बंदिस्त नसून संपूर्ण उघडी असल्यामुळे त्या गटारीमध्ये जंतूसंसर्ग होत असून गटारीचा उग्र स्वरूपाचा वास येऊन सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वस्तीत लहान मुले, वयोवृध्द महिला, पुरूष यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्या नागरी वस्तीतील नागरिकांना चिकन गुनिया, हिवताप, मलेरिया, डायरिया, डेंगू यासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याला सर्वस्वी जबाबदार कोण / असा सूर नागरी वस्तीतून विचारण्यात येत आहे. त्यामुळे शिरोळ नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून राजमाता जिजाऊ नगरमधील भुयारी गटर्स व रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
यावेळी बहुजन क्रांती संघटनेच्या वतीने प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे यांना देण्यात आले बहुजन क्रांती दल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल लोंढे संजय चौगुले महावीर सकट दत्ता लोंढे रामा सकट राहुल सकट लखन लोंढे अर्जुन सकट अभिजीत लोंढे अनिकेत लोंढे रोहित सकट प्रकाश लोंढे येश चौगुले सौ.चंद्रकला लोंढे सौ बाळाबाई सकट सौ रूपाबाई सकट सौ सोनाबाई लोंढे सौ लक्ष्मी सकट नंदाबाई चौगुले यांच्यासह राजमाता जिजाऊ नगर मधील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते