नोकरीचे आमिष देऊन जबरदस्ती केल्याप्रकरणी शिरोली पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल

Spread the love

नोकरी देतो असे सांगुन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी पुलाची शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजीदखान व रूस्तमखान (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी माजीदखान फरार झाला असून आरोपीस तात्काळ अटक करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिरोली हिंदुत्वादी संघटनेकडून देण्यात आला आहे.ही घटना ११ मे रोजी येथील सयाजी चव्हाण यांचे भाड्याने घेतलेल्या खोलीत
रात्री घडली असून याबाबतची फिर्याद आज दिली आहे. याबाबत पु शिरोली पोलिसातून मिळालेली माहिती की पीडित महिलेस तू कोल्हापूरला ये तुला चांगले मोलमजुरीचे काम देतो असे सांगुन संशयित आरोपी  माजीदखान याने बोलवून घेतले. माजिदखान याने आपले रुमवर शनिवारी 11 मे रोजी फिर्यादीस  आपल्या मिठीत घेवुन तिचेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीने त्यास प्रतिकार केला असता संशयित आरोपी माजिदखान याने फिर्यादीस तु आरडाओरडा केला,कोणाला सांगीतले तर तुला व तुझ्या कुंटुबाला जीवे ठार मारणेची धमकी देवून त्याने जबरदस्तीने फिर्यादीचे इच्छे विरुध्द जबरदस्तीने शारीरीक संभोग केला.तसेच फिर्यादीस आपले रुममध्ये कोंडुन ठेवले बाबत यातील फिर्यादी यांनी दि. 17 मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथील महिला सहाय्य कक्ष कोल्हापुर येथे पोलीस उपनिरीक्षक आर बी पवार यांचे समक्ष दिलेल्या तक्रारी जबाबा वरुन भादविस कलम 3762 (N), 342, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.अधिक तपास पोसई घोगरे करीत आहेत.दरम्यान शिरोली गावातील खोली भाड्याने देताना मालकांनी योग्य कागदपत्रे घेऊनच खोल्या घ्याव्यात अशी मागणी ही शिरोली हिंदुत्वादी संघटनेकडून करण्यात आली आहे.

error: Content is protected !!