दलितमित्र डॉ अशोकराव माने प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

Spread the love
दलितमित्र डॉ अशोकराव माने प्रतिष्ठानचे शिरोळभूषण पुरस्कार दिलिपराव माने, व अशोकराव टारे यांना  जाहीर, श्रीमती रत्‍नाबाई शेट्टी यांना आदर्श माता गौरव पुरस्कार
शिरोळ / प्रतिनिधी
येथील दलितमित्र डॉ आशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान व शिरोळ नगरपरिषद यांच्या वतीने देण्यात येणारा शिरोळ भूषण पुरस्कार रेणूका भक्त मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव माने व उद्योगपती अशोकराव टारे यांना देण्यात येणार असुन आदर्श माता पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मातोश्री श्रीमती रत्नाबाई शेट्टी (आऊ) यांना देण्यात येणार असल्याची घोषणा पुरस्कार निवड समितीचे प्रमुख व शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी बरोबर केली.
हा पुरस्कार वितरण सोहळा अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जून 2024 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शिरोळ येथील शिवाजी चौकात होणार आहे.दलित मित्र डॉ अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १ जून २०२ ४ रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौकात शिरोळ भूषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
ना हसनसो मुश्रीफ यांचे हस्ते व माजी मंत्री आमदार डॉ विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे  ,खा.धर्यशील माने,माजी खा.राजू शेट्टी,आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर,माजी आमदार अमल महाडीक,सुरेश हाळवणकर,उल्हास पाटील,श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील,गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिरोळ भूषण पुरस्कार प्राप्त दिलिपराव माने व अशोकराव टारे , यांना रोख रक्कम मानपत्र व सन्मानचिन्ह , फेटा , शाल ,श्रीफ्फळ देऊन गौरवण्यात येणार आहे.  यावेळी श्रीमती रत्नाबाई आण्णाप्पा शेट्टी यांचा आदर्शमाता पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.
 उल्लेखनीय कार्य केलेल्या सौ रेखा अमर पाटील – मलीकवाडे यांचाही विशेष सत्कार आयोजित करण्यात आला आहे.यावेळी  सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ. प.रुपालीताई सवने (परभणी) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी दलितमित्र डॉ अशोकराव माने माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,दत्तचे संचालक अनिलराव यादव,युवा नेते पृथ्वीराजसिह यादव,माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख,बजरंग काळे,जि प सदस्य प्रसाद खोबरे,धनंजय टारे,सुहास राजमाने,सुनील इनामदार,बबन बन्ने,सागर कोळी,विजय खातेदार यांच्यासह पुरस्कार निवड समितीचे सदस्य व माने सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते .
error: Content is protected !!