शिरटीकरांना मिळणार शुद्ध आणि मुबलक पाणी – सुर्यवंशी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील शिरटी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली या योजनेच्या माध्यमातून आता ग्रामस्थांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत आहे.

 

 

तसेच गावात कोट्यावधी रुपयाची विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत तर गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक कामे प्रस्तावित आहेत अशी माहिती माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी व विद्यमान सरपंच हसीना मुल्लानी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

यावेळी पत्रकार बैठकीत बोलताना राहुल सूर्यवंशी म्हणाले की, गेले वीस वर्षे शिरटीकरांना प्राणी प्रश्न भेडसावत होता यासाठी सातत्याने पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली या योजनेचे काम पूर्णत्वास आले.

 

 

यामुळे गावात शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे त्यामुळे ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त होत आहे तसेच गावच्या विकासासाठी प्रसंगी रास्ता रोको सारखे आंदोलन करून विकास कामे मार्गी लावले यामुळे शिरोळ घालवाड फाटा ते महावीर नगर ते शिरटी पर्यंतच्या रस्त्याच्या कामास मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी मंजूर करून आणण्यात आला.

 

 

त्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे गेले अनेक वर्षे रखडलेला रस्ता लवकरच पूर्णत्वास येणार आहे.
शिरटी गावाचा विकास साधत असताना शासनाच्या विविध योजनेतून माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निधी उपलब्ध करून अनेक विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

 

यामध्ये प्रामुख्याने पूर्व गावठाणमधील गटर्स व सांडपाणी नियोजन करण्यासाठी २५-१५ योजनेतून मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष प्रत्नातून १५ लाख रुपये मंजर झालेत, व उर्वरित निधीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

महावीर नगर मधील रस्ते व गटर्स करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.मुख्य चौकामध्ये गाव चावडी कार्यालय येथे ग्रामपंचायत कार्यालय एकत्र बांधणे व चौकातील व्यावसायिक यांना गाळे भाड्याने देण्यात येणार आहेत.

 

 

गावातील नळ कनेक्शनला मीटर बसविणे गावातील संपूर्ण सांडपाण्यासाठी स्वच्छता प्रकल्प राबविणे पर्यटन विकास निधीमधून नदीकाठी घाट बांधणे व दंडवत रस्ता करणे गावातील पूर्ण अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे पूर्व गावठाणमधील अंतर्गत गटर्स करणे गावातील सर्व रस्ते करणेसाठीं निधीची मागणी करण्यात आली आहे.

 

 

समाज कल्याण विभागामधून मंत्री धनंजय मुंडे यांच्या फडातून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता करण्यासाठी १५ लाख मंजूर झाले जि.प. सदस्य दानोळी सौ. शुभांगी शिंदे यांच्या फंडातून महावीर नगर येथील शांतीसागर मराठी शाळा दुरुस्तीसाठी ४ लाख मंजूर करून शाळेची दुरुस्ती करण्यात आली.

 

जि.प. सदस्य पद्माराणी पाटील यांच्या फंडातून साडेआठ लाख रुपये निधी मंजूर करून नवीन अंगणवाडी बांधण्यात आली शिरटी घालवाड रस्ता होणेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.मंत्री दीपक केसरकर यांना भेटून निवेदन दिले. त्या अनुषंगाने मुख्यमन्त्री सडक योजनेतून ५ कोटी ३१ लाख रुपयेचे काम सुरु आहे.

 

व काम लवकर पूर्ण होणेसाठी प्रयत्न करणार आहे श्री. हनुमान मंदिर, श्री. भैरेश्वर मंदिर, श्री. कल्लेश्वर मंदिर, जैन बस्ती, व नरसोबा मंदिर, मरगाई देवालय, या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. जि.प.सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या फडातून श्री.हनुमान मंदिर, श्री कल्लेश्वर मंदिर पालखी रस्ता कॉक्रीटीकरण करणे ७ लाख मंजूर करून काम पूर्ण करण्यात आले.

 

 

जि. प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या फंडातून सात लाख रुपये मंजूर करून सार्वजनिक स्मशानभूमीची सुधारणा करण्यात आली गावातील यात्रेसाठी आवश्यक असणारा विद्युत डी.पी. ६३ केव्ही व्होल्टेज वरून १०० केव्ही व्होल्टेजचा बसवू कायमस्वरूपी व्होल्टेजचा प्रश्न सोडविला.

 

 

तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबर रोजी व्यसन मुक्ती कार्यक्रम दारू नको दुध प्या उपक्रम राबविण्यात येतो.गावातील तरुणांना एकत्र करून रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर राबविले जातात.
गावामध्ये एक गाव एक गणपती या उपक्रमासाठी प्रयत्न केले.

 

 

प्रत्येक महिन्याला सार्वजनिक स्मशानभूमी, मागासवर्गीय स्मशानभूमी, मुसलीम दफनभूमी परिसराची स्वच्छता केली जाते. गावातील सर्व जि. प. शाळा परिसराचे सर्व तरुण मंडळांना घेवून स्वच्छता केली जाते. जनावरांसाठी वेळोवेळी लसीकरण व तपासणी शिबीर आयोजित केले जाते स्वातंत्र्य दिनानिमित्त ७५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांचा सत्कार १५ ऑगस्ट रोजी करण्यात आला.

 

 

गावातील सर्व १० वी व १२ वी पास विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार केले जाते. शिक्षक दिन निमित्त सर्व शिक्षकांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले जाते. असेही त्यांनी शेवटी सांगितले यावेळी उपसरपंच प्रकाश माळी आलमनिसार मुल्लाणी राजकुमार शिरगांवे, सतीश चौगुले, सागर पवार सुनील माळी यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट
नाविन्यपूर्ण उपक्रम
दलित समजतील व्यकी मयत झाल्यास त्या कुटुंबाला मृताच्या अंतविधीसाठी ग्रामपंचायतीकडून २००० हजार दिले जाते. तसेच दलित समाजातील पहिली मुलगी जन्मास आली तर तिच्या नावे ग्रामपंचायतीकडून २००० हजार रुपयाची ठेव ठेवली जाते. यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम शिरटी ग्रामपंचायतीच्यामाध्यमातून राबविले जात आहेत

error: Content is protected !!