अखेर चार दिवसपासून विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास जीवनदान

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

टोप येथील दक्षिणवाडी परिसरातील मळ्यातील विहीरीत गेल्या चार दिवसापासून कोल्हा पडला असल्याचे येथील शेतकऱ्यांना दिसले होते. त्या कोल्हयाला वनविभागाच्या वन्यजीव बचाव पथकच्या व शेतकऱ्याच्या अथक प्रयत्नांने आज जीवदान मिळाले.

 

गेल्या चार दिवसापासून दक्षिणवाडीतील येथील उदय गायकवाड यांच्या मळ्यातील शेतात असलेल्या विहीरीत कोल्हा असल्याचे दिसले.पण उदय गायकवाड यांनी तेथील शेतकरी गणपती पाटील यांच्या सहकार्याने त्या कोल्हयाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण

 

विहिरीतील झुडपात पुन्हा कोल्हा जाऊन बसला तोही अयशस्वी ठरला त्या नंतर शेतकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क केला. त्यानुसार वनविभागाने वन्यजीव पथकाला पाठवून देवून त्या पथकाने विहीरीतील कोल्हया ला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडला त्या पिंजऱ्यात तो कोल्हा गेल्याने त्याला जीवदान मिळाले.

 

त्या कोल्हया ला वनविभागाच्या वन्यजीव पथकाने नैसर्गिक अधिवासात सोडले.वनविभागाचे अमोल चव्हाण, आशुतोष सूर्यवंशी, प्रदीप सुतार,मतीन बागी, विनायक माळी,

ओकार काटकर या वन्यजीव पथकाबरोबर येथील शेतकर्यानी सहभाग घेत कोल्ह्याला जीवदान दिले.

error: Content is protected !!