“धक्कादायक” ट्रक व मोटरसायकल अपघातात युवक जागीच ठार

Spread the love

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे

 

खोची तालुका हातकणंगले येथे सोनाली वसाहतीमध्ये राहणाऱ्या सारिका संभाजी जाधव या आजारी असल्याने त्या आपला मुलगा आदित्य जाधव याच्या सोबत मोटरसायकल क्रमांक एम एच 09- 4430 वरून भेंडवडे इथे दवाखान्यात गेल्या होत्या.

 

 

ते दोघेही दवाखान्यातून दुपारी दीडच्या दरम्यान घरी परतत होते.खोची रोडवरील भेंडवडे गावच्या हद्दीत पेठ वडगावच्या दिशेने सिमेंट पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकने मोटर सायकलला समोरून जोराची धडक दिल्याने मोटर सायकल वरील आई आणि मुलगा रस्त्यावर जोरात आपटले.

 

यामध्ये आई बाजूला फेकली गेली तर मुलाच्या अंगावरून ट्रक गेल्याने शरीराचा चेंदामेंदा होऊन तो जागीच ठार झाला.अपघाताचा आवाज येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.नागरिकांनी जखमी सारिका जाधव यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी

 

 

पेटवडगावात खाजगी रुग्णालयात दाखल केले.तर मृत्युमुखी पडलेल्या आदित्य याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.या अपघाताची नोंद पेटवडगाव पोलीस ठाण्यात झाले असून अधिक तपास जावेद रोटीवाले करीत आहेत.

error: Content is protected !!