जयसिंगपुरात श्री सद्गुरू संत बाळूमामा भंडारा उत्सव सोहळा

Spread the love

जयसिंगपुरात श्री सद्गुरू संत बाळूमामा भंडारा उत्सव सोहळा शुक्रवारी 10 मे रोजी येथे नांदणी रोडवरील संभाजीनगर येथे संपन्न होत आहे त्यासाठी श्री बाळूमामा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या श्री सद्गुरू संत बाळूमामा भंडारा उत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगर एबीएस बॉईज जयसिंगपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे या भंडारा उत्सव सोहळ्यासाठी श्री हॉल सिद्धनाथ देवाची व श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थान आदमापूरचे भाकणूक कथनकार चे मानकरी माननीय श्री गुरुमाऊली कृष्णात बाबुराव ढोणे वाघापूर महाराज यांची प्रमुख उपस्थिती असून यांच्या हस्ते महाप्रसादाचे उद्घाटन होणार आहे दरम्यान या भंडारा उत्सव सोहळ्यामध्ये शुक्रवारी 10 मे रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर शहरातील मुख्य क्रांती चौक मार्गे तेरावी गल्ली रणवीर चौक व जयसिंग नगर संभाजीनगर नाणी रोड येथून कलावती मंदिर गाडगे मळा इथपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता अभिषेक व फोटो पूजन करण्यात येणार आहे या भंडारा उत्सव सोहळ्यामध्ये मिरवणुकीमध्ये विविध खास आकर्षण म्हणून अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले आहे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता श्रींची महाआरती त्यानंतर येणाऱ्या सर्व भक्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्री चिखलीकर यांचा वालंग व सबीना कार्यक्रम ही होणार आहे रात्री नऊ वाजता वाजता धनगरी ओव्यांचा कार्यक्रम सोहळा ही होणार आहे शाहीर भगवान कोळेकर व शाहीर बाळू खोत हे या धनगरी ओव्यांचे कार्यक्रम सोहळ्यामध्ये सादर करते आहेत छत्रपती संभाजी नगर बाळूमामा भंडारा उत्सव कमिटी व एबीएस बॉईज मित्र मंडळ श्री साई गणेश उत्सव मंडळ व्ही बॉईज मित्र मंडळ आणि या भंडारा उत्सवात सहकार्य करणारे विविध मंडळ हे या उत्सव मंडळाचे आयोजक आहेत तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

error: Content is protected !!