शिरोळातील प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरोळ : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शाश्वत विकासाचे कार्य कौतुकास्पद आहे त्यामुळेच विरोधकांनी संविधानाच्या व आरक्षणाच्या संदर्भात अफवा पसरवण्याचे काम केले संविधान बदलणे कोणालाही शक्य नाही विरोधकांच्या अफवाला जनता बळी पडणार नाही.त्यामुळे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी शिरोळ मधील जनता खासदार धैर्यशील माने
यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष आणि शिरोळचे माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शिरोळात प्रचार फेरीच्या माध्यमातून घर टू घर प्रचार करण्यात येत आहे याप्रसंगी माजी नगरसेवक डॉ अरविंद माने हे बोलत होते.
यावेळी डॉ माने पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील सर्वसामान्य जनतेला मोफत धान्य पुरवठा मोफत कोरोना लस पाच लाख रुपयापर्यंतच्या मोफत आरोग्य सुविधा मोफत उज्वला गॅस कनेक्शन असे हिताचे निर्णय घेतले.
त्यामुळेच जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.त्यामुळे चारसो पार हा आकडा गाठण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले की खासदार धैर्यशील माने यांनी शिरोळ शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी दिल्याने शहराचा शाश्वत विकास झाला.निधी खेचून आणणारा लोकप्रतिनिधी असणे आवश्यक असल्यामुळे शहरातील जनता धैर्यशील माने यांना आपले मत देऊन त्यांना आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा खासदार म्हणून देशाच्या सर्वोच्च सभागृहात निश्चितपणे पाठवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई,माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख, अर्जुन काळे, माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील,माजी नगरसेवक राजेंद्र माने,एन वाय जाधव, श्रीवर्धन माने देशमुख,विजय उर्फ दादासो कोळी, दयानंद जाधव,
बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख, रयत क्रांती संघटनेचे शहाजी गावडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे बजरंग काळे,उत्तमराव पाटील, एकनाथ शिंदे, शिवसेना गटाचे जुगल गावडे, सचिन पाटील, संजय शिंदे,भाजपा शिरोळ शहराध्यक्ष संभाजी भोसले, अजय कोळी,
बबन बन्ने,सुभाष माने ताराप, दत्तात्रय सूर्यवंशी, नंदू जाधव यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या प्रचार फेरीत सहभागी झाले होते.शहरातील प्रमुख मार्गावरून आज प्रचार फेरी काढून खासदार धैर्यशील माने यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.