कुरुंदवाड / प्रतिनिधी
जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर असून जपान जर्मनी यासारख्या देशाला मागे टाकून येणाऱ्या दोन वर्षात तृतीय क्रमांकावर येईल मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे 2030 सालात आपला देश महासत्ता होईल.यासाठी नरेंद्र मोदींना या देशाचे पंतप्रधान करणे आवश्यक आहे.
यासाठी खास.धैर्यशील मानेंना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मत आहे.म्हणून धनुष्यबाणला मतदान करून देशाला सामर्थ्यशाली करा असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.हसन मुश्रीफ यांनी केले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महायुतीचे उमेदवार खास.धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते.आम.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर,रजनीताई मगदूम,केंद्रीय रसायन महामंडळाचे संचालक डॉ.संजय पाटील,माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे,दादासाहेब पाटील,प्रकाश पाटील-टाकवडेकर, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आदी प्रमुख उपस्थिती होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ.पाटील-यड्रावकर म्हणाले
400 खासदार निवडून आणून राज्यघटना बदलणार आहेत.अशा पद्धतीची अपप्रचार सुरू आहे. मोदींसाहेबांची अशी भूमिका असती तर गेल्या वेळी साडेतीनशे खासदार होते.त्यावेळी ते राज्यघटना बदलू शकले असते.
हे शक्य नाही त्यामुळे भुलथापांना बळी न पडता संकल्प विकसित भारताचे व्हिजन असणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे सांगितले.प्रारंभी स्वागत प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष डांगे यांनी केले.
यावेळी सिताराम भोसले,माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील,रमेश भुजूगडे,प्रा.चंद्रकांत मोरे,विजय जमदग्नी, वर्षा पाटील,रघु नाईक आदींनी मनोगते व्यक्त केली. आभार माजी उपनगराध्यक्ष शरद आलासे यांनी मानले.
यावेळी उदय डांगे,उमेश कर्नाळे,बाळीशा दिवटे,चंद्रकांत जोंग, राजेंद्र फल्ले,अण्णासाहेब वाले,रणजीत डांगे,
शाबगोंड पाटील,आण्णाप्पा बंडगर,जिन्नाप्पा पोवार, बाळासाहेब बुरुड,संजय डोंगरे,कृष्णा नरके,भीमराव यादव,माजी नगराध्यक्षा कविता जोंग,सुजाता डांगे, तेजस्विनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.