“ब्रेकिंग” युवकाचा पाठलाग करून कोयत्याने वार करून खून

Spread the love

उदगाव ता शिरोळ येथील खोत पेट्रोल पंपासमोर पूर्ववैमन्याशातून युवकाचा पाठलाग करून धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना आज गुरुवारी घडली.सचिन चव्हाण राहनार कुपवाड जिल्हा सांगली असे मृत युवकाचे नाव आहे.दरम्यान दोन हल्लेखोरांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतली त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कुपवाड जिल्हा सांगली येथील सचिन चव्हाण व संशयित आरोपी यांचा गेली महिन्याभरापासून वाद सुरू होता एकमेकांना जेवे मारण्याच्या धमक्या दिल्याने आज संशयित हल्लेखोरांनी मोटरसायकल वरून जाणाऱ्या सचिन चव्हाण यास उदगाव जयसिंगपूर रोडवरील असणाऱ्या खोत पंपा समोर पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला यावेळी सचिन चव्हाण हा जवळच असणाऱ्या प्रभात वेल्डिंग दुकानात शिरला यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केल्याने चव्हाण हा जागीच ठार झाला आहे. हल्ला झाल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपींना स्थानिक नागरिक व पोलिसांच्या पथकाने पकडून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके,जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान ह

क्के घटनास्थळी दाखल झाले आहे.अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत.दरम्यान दिवसाढवळ्या घडलेल्या या खुणाच्या घटनेमुळे उदगाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

error: Content is protected !!