शिरटी ता.शिरोळ येथे ग्रामदैवत श्री भैरैश्वर यात्रेच्या विषयावरून गेल्या महिन्याभरापासून दोन गटात अंतर्गत धुसमुस सुरू आहे.पंधरा दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या बैठकीत पोलिसांच्या समोरच एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला होता.अखेर गावात शांतता राखण्याच्या उद्देशाने तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली.यावेळी जुन्या यात्रा कमिटीने माघार घेऊन विरोधी गटाला यात्रा व कलशारोहन सोहळा साजरा करण्यास समंती दिली.मात्र विरोधी नूतन यात्रा कमिटीने श्री भैरैश्वर मंदिर जीर्णोद्धार समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता बेकायदेशीर समिती स्थापन केली.तसेच कलशारोहण सोहळा दिनांक २४ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान संपन्न होणार असल्याचे पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले.सदरची मंदिर जीर्णोद्धार समितीने कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भैरेश्वर मंदिराच्या स्वयंघोषीत कलशारोहण समितीच्या अध्यक्षाची निवड रद्द करावी अशी मागणी जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष कल्लाप्पा खवाटे यांनी आज शिरोळ तहसीलदार,पोलीस निरीक्षक आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहीती मूळ जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष कल्लाप्पा खवाटे यांनी रात्री आठ वाजता शिरटी येथील बैठकीत दिली.निवेदनावर जयपाल शिरगावे,रामगोंडा पाटील, अरुण आंबोळे,सचिन खोबरे,सागर मगदूम, राजकुमार कोगनोळे,राजकुमार ढेकळे, अभय गुरव,संतोष पाटील, सूर्यकांत उदगावे, पोपट चौगुले,विश्वास कांबळे, बाळासो बंडगर यांच्यासह ८० हुन अधिक नागरिकांच्या सह्या आहेत.