शिरोळचे पत्रकार चंद्रकांत भाट यांना आत्मसन्मान गौरव पुरस्कार जाहीर

Spread the love
कोल्हापूर येथे शनिवारी १३ एप्रिल रोजी होणार मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा
शिरोळ / प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संघर्ष नायक मीडिया,स्वराज्य क्रांती सेना,पॅंथर आर्मी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती (कोल्हापूर)  या संस्थेतर्फे यावर्षीचा आत्मसन्मान गौरव पुरस्कार शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व आमची मराठी शिरोळ न्युजचे तालुका प्रतिनिधी पत्रकार चंद्रकांत तुकाराम भाट यांना  जाहीर झाला आहे.सदर पुरस्कार प्रदान समारंभ शनिवारी १३ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजता शाहू स्मारक भवन,दसरा चौक कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती संघर्ष नायक मीडियाचे प्रमुख संतोष आठवले यांनी दिली.
येथील पत्रकार चंद्रकांत भाट यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले.लेखन आणि साहित्य क्षेत्रातील आवड असल्याने अनेक वर्षापासून शिरोळ प्रतिनिधी म्हणून वृत्तपत्रात ते सेवाकार्य करीत आहेत. त्यांनी लेखणीच्या माध्यमातून अनेक सामाजिक तसेच अन्य प्रश्नावर आवाज उठवून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.र्निभिड पत्रकारीते बरोबरच सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे काम कौतुकास्पद आहे.शिरोळ गावच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय सहभाग घेत त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमठविला आहे.
एकूणच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याची दखल घेऊन पत्रकार चंद्रकांत भाट यांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध संस्थांच्या वतीने पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी विविध साप्ताहिक दैनिक वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून कार्य केले आहे.सध्या युवकांचा नवा महाराष्ट्र या वृत्तपत्राचे उपसंपादक व आमची मराठी शिरोळ न्युजचे तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
श्री.भाट यांनी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे सदस्य,राजाराम विद्यालय नंबर २ चे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून त्यांचे आदर्शवत कार्य आहे. प्राथमिक शाळांच्या पायाभूत सुविधा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांचे कार्य आहे.एकूणच त्यांच्या कार्याची दखल घेवून आत्मसन्मान गौरव हा पुरस्कार जाहीर झालेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
error: Content is protected !!