सामाजिक बांधिलकी जपत शिरोळ तालुक्यातील विविध प्रकारची प्रोत्साहन पर मदत
शिरोळ / प्रतिनिधी
तारदाळ (ता हातकणंगले) येथील इबेनस्टॉक पोझिस्ट्रोन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत शिरोळ तालुक्यातील शाळांना शालोपयोगी साहित्याचे वाटप आणि भौतिक विकासकामे करून विविधरुपी भरीव मदत केली आहे.यामुळे या कंपनीचे तालुक्यात कौतुक होत आहे.
यावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साहिल कुलकर्णी, व्यवस्थापक किशोर निकम, सहायक व्यवस्थापक महादेव गायकवाड,एस एम बागडे, अडसूळ,संदीप तांबिरे आणी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
इबेनस्टॉक पोझीस्ट्रोन या कंपनीचा उद्देश म्हणजे ज्या शाळांना भौतिक सुविधांचा अभाव अशा शाळांमध्ये मदत करून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणे हा होय त्यामुळे शाळेतील पेविंग ब्लॉक बसवणे संरक्षक भिंतीचे रंगकाम, टेबल,खुर्ची,अँड्रॉइड टीव्ही, कपाट, खेळायचे साहित्य सुविधा पुरविण्यात आले आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद येथील कुमार विद्यामंदिर, लाल बहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच बुबनाळ येथील कुमार विद्यामंदिर या शाळांमध्ये साहित्य आणि सेवा पुरविण्यात आल्या असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीने कंपनीच्या कार्याचे कौतुक करत कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सत्कार केला उपस्थित मान्यवरांचे आभार मानत शुभेच्छा दिल्या.