शिरोळ / प्रतिनिधी
येथील राजश्री शाहू विद्यामंदिर नं १ या शाळेत महिला दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सौ.भारती कुंभार तर कन्या विद्या मंदिर दत्तनगरचे अध्यापक किरण पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अध्यापक दीपक वावरे यांनी केले.
यावेळी किरण पाटील यांनी मुलांच्या जीवनाला आकार देण्याचे काम आणि प्रामुख्याने आई करत असते. छत्रपती शिवाजी महाराज,एडिसन,साने गुरुजींचे यांच्यासह महापुरुषांचे चरित्र नक्की वाचावे.मुलांना वाचनाकडे वळवावे .संस्कारीत पिढी घडवण्यामध्ये आईचा मोठा महत्त्वाचा वाटा आहे .मुलांना वेळ द्यायलाच हवा.मुलांच्या हळुवार मनाला जोपासले पहिजे. मार्क आणि शिस्त यांच्या पलीकडेही एक जग आहे.मातृभाषेतील शिक्षण जीवन घडवते.मातृभाषेबरोबर इतर भाषा शिकण्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.
यावेळी इयत्ता चौथी प्रज्ञाशोध चाळणी परीक्षेतील विद्यार्थी आयुष कटकोळे, चारुदत्त फल्ले, राजवीर पिसाळ,विराज माने, कमलेश तेली ,सार्थक जाधव,आयुष काळे,अथर्व परीट,हर्षवर्धन कदम, संस्कार लोंढे या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन पालकांसमवेत सत्कार करण्यात आला .
तसेच इ ४ थी प्रज्ञाशोध निवड परीक्षेमध्ये आयुष कटकोळे 176 गुण , चारूदत फल्ले 172 गुण विराज माने 172 गुण मिळवून तालुका यादीमध्ये स्थान पटकावले .त्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी सुजाता माने,सोनाली पिसाळ यांनी यशस्वी मुलांचे व वर्षभर केलेल्या सातत्य पूर्ण प्रयत्नामुळे यश मिळाल्याबद्दल वर्गशिक्षकांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
माता पालकांचे In out. हा मनोरंजक खेळ घेण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक निकिता कांबळे, द्वितीय क्रमांक सोनाली पिसाळ, तृतीय क्रमांक सुप्रिया गावडे यांनी यश संपादन केले. १ ते १०० अंक उलट म्हणण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक रूपाली कुंभार, द्वितीय क्रमांक उर्मिला सोहोनी यांनी यश संपादन केले. संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुराधा लोंढे, द्वितीय क्रमांक दिपाली फल्ले, तृतीय क्रमांक सारिका भजनावळे यांनी यश संपादन केले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक फल्ले राजेश संकपाळ, विजय पट्टणशेट्टी ,प्रदीप पिसाळ, सुप्रिया गावडे, संजीवनी चुडमुंगे, श्रद्धा कुन्नुरे ,मोहिनी कांबळे, अश्विनी पाटील हे सदस्य, विमल वर्धन ,भारती इंगळे, प्रियंका जगदाळे ,अश्विनी चुडमुंगे तेजस्विनी पाटील,आण्णासो पाटील अध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक बाळासो कोळी यांनी केले , आभार अध्यापक रमजान यांनी मानले.