शिरोळ / प्रतिनिधी
जांभळी (ता.शिरोळ) येथील प्रसिद्ध श्री सिध्द सोनूदेव यांचे शुक्रवारी सायंकाळी जय भवानी चौक,शिरोळ येथे दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची मोठी गर्दी झाली होती भाविकांनी श्री सिद्ध सोनू देव यांची जंगी मिरवणूक काढून स्वागत केले.
जय भवानी मंडळ,अब्दुल खलिफ युवाशक्ती,शंभूराजे युवा फ्रेंड सर्कल,निलकंठ उर्फ पिंटू फल्ले युवा मंच,बाल शिवाजी मंडळ,आदर्श मंडळ माळभाग यांच्या वतीने या श्री सिद्ध सोनूदेव यांच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शिरोळ शहर व तालुक्यातील भक्त व ग्रामस्थ मोठया संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते.
अजिंक्यतारा मंडळ येथे श्री सिध्द सोनूदेव यांचे आगमन झाले.बसस्थानक,छत्रपती संभाजी महाराज चौक,पोस्ट ऑफिस या मार्गावरून धनगरी ढोल व इतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.अश्वारूढ श्री सिद्ध सोनूदेव यांचे रस्त्याच्या दुतर्फा राहून भक्तगण पुष्पवृष्टी करीत होते.जय भवानी चौकात शोभेच्या दारूच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले होते.
शिरोळ शहरात प्रथमतःच श्री सिध्द सोनूदेव यांचे आगमन झाले होते. त्यांच्या दर्शनासाठी भक्तगणांची अलोट गर्दी उसळली होती.दर्शनासाठी संयोजकानी नेटके नियोजन केल्याने सर्वांना दर्शनाचा लाभ घेता आला.