शिरोळ / प्रतिनिधी
जागतिक सामाजिक संस्था असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ शिरोळच्या अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते रोटे सुनील बागडी यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच सचिवपदी डॉ अंगराज माने खजिनदारपदी अमित पंडित यांची व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
सन 2024 – 25 या कालावधीसाठी रोटरी क्लब ऑफ शिरोळ या संस्थेच्या कार्यकारिणीची निवड करण्यासाठी रोटीरियन सदस्यांची बैठक झाली या बैठकीत प्रेसिडेंट म्हणून सुनील बागडी सेक्रेटरी म्हणून डॉ अंगराज माने ट्रेझरर म्हणून अमित पंडित यांची एकमताने निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी रोटरी क्लब ऑफ शिरोळचे सदस्य रोटे पंडित काळे, नितीन शेट्टी,बापूसाहेब गंगधर,अविनाश टारे, सचिन देशमुख, दिनेश गावडे, शरद चुडमुंगे,बाळासाहेब शेट्टी, अतुल टारे,विजय माळी,बाबुराव उर्फ आबासाहेब जाधव, चिंतामणी गोंदकर,मोहन माने,श्रीकांत शिरगुप्पे,दीपक ढवळे,विठ्ठल पाटील, प्रथमेश देसाई, प्रवीण कानवाडे, संदीप बावचे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.