राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत वेदांत गावडे यांने मिळवले रौप्यपदक

Spread the love
राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत वेदांत गावडे यांने मिळवले रौप्यपदक
शिरोळ / प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण (ता चिपळूण) येथील विठ्ठलराव जोशी क्रीडा संकुल येथे  झालेल्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाचा खेळाडू वेदांत अनिल गावडे याने रौप्यपदक पटकाविले राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा चूरशीने पार पडल्या.या स्पर्धेत वेदांत अनिल गावडे यांने द्वितीय क्रमांक मिळवला तसेच सांघिक स्पर्धेत वेदांत गावडे, श्रेयश देबाजे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
या सर्व यशस्वी खेळाडूंना श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षी गणपतराव पाटील श्री दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष एम व्ही पाटील,सचिव निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी सदस्य यांचे प्रोत्साहन लाभले.तर खेळाडूंना क्रीडाशिक्षक संजय देबाजे यांचे मार्गदर्शन लाभले.
error: Content is protected !!