उदगांव येथील श्री उदयसिध्द बिरोबा मंदिराजवळ असलेल्या ऊसतोड मजूराच्या झोपड्यांना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास भिषण आगीत सुमारे पाच झोपड्या व सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले.तर एक शेळी पुर्णतः भाजुन जखमी झाली आहे.दरम्यान जवळच असणारी जनावरे व ट्रॅक्टर बाजुला केल्याने अन्य नुकसान टळले.घटनास्थळी जयसिंगपूर पालिका व शिरोळ दत्त कारखान्याच्या अग्निशमन दलाने आग अटोक्यात आली.मंगळवारी सायकांळी महिला जेवण करीत असताना एका झोपडीला आग लागली.मात्र वारा सुटल्याने एका झोपडीला लागलेली आग दुसर्या झोपडीला त्यानंतर अन्य तीन झोपड्याना लागली.यावेळी झोपड्यांमध्ये असलेल्या गॅस टाकीला मोठी आग लागल्याने मोठया उंचावर गॅसच्या टाकीतून आगीचे लोट जात होते.पाच झोपड्यामधील अन्न,धान्य,कपडे व सर्व प्रापंचिक साहित्य एका क्षणात जळून खाक झाल्याने ऊसतोड महिलांना अश्रु अनांवर झाले.आगीमुळे पाच कुटुंबातील ऊसतोड मजूराचे संसार उघड्यावर पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.