जयसिंगपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी तीर्थक्षेत्र श्री नृसिंहवाडी येथे श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन शुभाशीर्वाद घेतला.यावेळी तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कोल्हापूर उपाध्यक्ष व शिरोळचे माजी सरपंच बी.जी.माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांनी मोहिते पाटील यांचे स्वागत करून शाल श्रीफळ गुच्छ व झाड देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिरोळ तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष युवराज जगदाळे,उल्हास पाटील,रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान मोहिते पाटील यांनी शिरोळ येथील पुष्पकनगर जगदाळे यांच्या निवासस्थानी भेट दिली.जगदाळे परिवारातील मंडळींची आप्त पूर्वक चौकशी केली.गेली अनेक वर्षे या कुटुंबाशी असलेला जिव्हाळा स्नेह आणि ऋणानुबंध कायम पणे राहील असे सांगितले.जगदाळे कुटुंबांच्याकडून मोहिते पाटील यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.