“पाच दिवस,पाच रात्री” तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार

Spread the love

शिरढोण येथील बेपत्ता असलेल्या आदित्य मोहन बंडगर यांची गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहीमेस अद्याप शोध लागला नव्हता.बोटीच्या सहायाने ही दुसरी वेळ पहिल्या दिवशी बुधवारी ७ तास व शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून ते ४ वाजल्याप्रर्यत्न शोध मोहीम चालू होते.हि शोध मोहीम तब्बल ७ तास चालू होती.शोध मोहीम चालू असताना पंचगंगेच्या पात्रात दोन मगरी वावरताना दिसुन आल्या.नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नव्हते.पाण्यात मगरी वावरताना दिसत होत्या पण मगर तरी आदित्यला घेऊन गेलेली नसेल ना?

अशी नागरिकांच्या मध्ये चर्चा केली जात होती.आज अभिजीत चव्हाण व सागर सुतार यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं देखील शोध मोहीम चालू असताना त्यातून देखील शोध लागला नव्हता.घरातील व्यक्तीनी आपापल्या पाहुण्यांच्याकडे चौकशी केली असता तेथे देखील नसलेल्याची माहीती मिळाली.मग हा आदित्य गेला तरी कोठे काहीच कळेना.लोकाच्या मध्ये खळबळ उडाली होती.काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे काही घडले की, बोटीने अखेरची फेरी मारण्यासाठी जात असताना आदित्यचा मदतीची हाक ऐकु येताच सर्व जण सैरावैरा होऊन त्याला वर काढायला धावु लागले व सुखरुप त्याला घरी घेऊन आले.त्याची प्रकृती ही उत्तम असुन अशक्त पणामुळे त्याच्यावर उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहीमेस प्रदिप ऐनापुरे,हैदर‌अली मुजावर,नितेश व्हणकोरे,निशांत गोरे यांनी मोलाचे योगदान दिले याबद्दल त्यांचे गावात कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!