शिरोळकरांवर पुढील 10 वर्ष जमीन आरक्षणाची टांगती तलवार – पृथ्वीराजसिंह यादव

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळचा विकास आराखडा दिनांक 5 मार्च 2024 रोजी प्रसिध्द झाला आहे. त्यामध्ये बऱ्याच शेतकरी, नागरीकांच्या जमिनी रस्ते,बगिचा,शाळा,खेळाचे मैदान यासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.विकास आराखड्याचा अहवाल पाहिला असता त्यांनी दर दोन वर्षांनी एक टप्पा अशा पुढील दहा वर्षात पाच टप्प्यात शेतकऱ्यांची जमीन आरक्षीत करण्याचा मसुदा जाहिर केला आहे.जमीन आरक्षणाच्या संकटासाठी एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज आहे.जमीन आरक्षण अन्यायाविरुद्ध मी शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभा राहून शासन दरबारी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे असे आश्वासन युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार बैठकीत दिले.
शिरोळचा विकास आराखडा तयार करीत असताना जमीन आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यात 5 ठिकाणी गार्डन व पार्क, 1 ठिकाणी खेळाचे मैदान, 15 ठिकाणी  सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, 4 ठिकाणी दवाखाना व प्रसुती केंद्र,10 ठिकाणी नगरपरिषद वापरासाठी जागा दुसऱ्या टप्प्यात :16 ठिकाणी कचरा वर्गीकरण जागा, 14 ठिकाणी खेळाचे मैदान, 3 ठिकाणी बेगर लोकांच्यासाठी घर जागा, 8 ठिकाणी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 9 ठिकाणी भाजीपाला बाजार तिसऱ्या टप्प्यात : 7 ठिकाणी गार्डन पार्क, 2 ठिकाणी शाळा व ग्राउंड, 20 ठिकाणी दफनभूम, 17 ठिकाणी कत्तलखाना चौथ्या टप्प्यात : 19 ठिकाणी, सांडपाणी निस्सारण प्रकल्प, 18 ठिकाणी मटन शॉप, फिश मार्केट, 6 ठिकाणी शॉपिंग सेंटर आणि पार्किंग, 13 ठिकाणी नगरपरिषद वापरासाठी जागा पाचव्या टप्प्यात :11ठिकाणी गार्डन व पार्क, 21 ठिकाणी खेळाचे मैदान, 12 ठिकाणी शाळा व ग्राउंड वरील मसुद्यानुसार पुढील दहा वर्षात शिरोळ शहरातील बहुतांश नागरिक, शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित होण्याची भीती आहे. या खेरीज नगरपरिषदेला इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी आरक्षित करणे गरजेचे आहे का ? असा सवाल केला.शहरातील सर्वच नागरिकांनी आत्ताच एकजूट व एकसंघ होण्याची गरज आहे. तसेच भविष्यात आलेल्या आरक्षणाचे संकट थोपवण्यासाठी एकत्रीपणे लढा उभारण्याची गरज आहे. आरक्षण अन्यायाविरुद्ध मी शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभा राहून शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. असे आश्वासन पृथ्वीराजसिंह यादव यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिले.

दरम्यान,नागरिकांच्या जमिनीवर रस्ते व इतर उपयुक्तीसाठी टाकलेल्या आरक्षणाच्या अनुषंगाने रविवारी कल्लेश्वर मंदिराच्या हॉलमध्ये पीडित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश माळी होते. या बैठकीत पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले, आरक्षण टाकताना शेत जमिनीवर प्रामुख्याने रस्त्याचे आरक्षण टाकले आहे. यामध्ये भूमी संपादन किंमत म्हणून प्रति गुंठ्याला 17 हजार 740 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना दर दिला आहे. याशिवाय शाळा, खेळाचे मैदान, बेघर, नगरपरिषद दवाखाना, बाग दफनभूमी यासाठी प्रति गुंठा 14 ते 15 हजार रुपये इतका मोबदला अहवालात नमूद केला आहे.बैठकीत शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी पीडित शेतकरी नागरिक कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!