स्व डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या स्मृतिदिनी शिरोळात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन स्व.डॉ.आमदार आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्त कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील सोशल फौडेंशन यांच्यावतीने सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजता पुरुष गटातील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त चौथी मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस माजी सरपंच गजानन बाबुराव संकपाळ यांच्याकडून 7001 रुपये रोख रक्कम द्वितीय क्रमांकाचे बक्षीस स्वप्नील अनिल पाटील यांच्याकडून 5001 रुपये रोख रक्कम तृतीय क्रमांकाचे बक्षीस रमेश शिवाजीराव आरगे यांच्याकडून 3001 रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे.तसेच स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व सहभागी स्पर्धकांना मेडल श्री रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव रामचंद्र माने यांच्याकडून देण्यात येणार आहे.
सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजता शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौक ते जिरगे पेट्रोल पंप परत छत्रपती शिवाजी चौक पर्यंत मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना गळ्यातील मेडल व टी-शर्ट देण्यात येणार स्पर्धेतील स्पर्धकांना 100 रुपये प्रवेश फी देऊन नाव नोंदणी करावयाची आहे.
शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 अखेर स्पर्धकांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे स्पर्धा झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.स्पर्धेच्या प्रवेशासाठी अब्दुल खलिफ मोबाईल नंबर 8600425858 अजिंक्य गावडे मोबाईल नंबर 9545191349 यांच्याशी संपर्क साधावा तसेच स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी नवनाथ पुजारी मोबाईल नंबर 8149865464 व संदीप शहारे मोबाईल नंबर 7448298241 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी शिरोळ नगरपरिषद शिरोळ पोलीस ठाणे शहरातील सर्व सार्वजनिक तरुण मंडळ सेवाभावी संस्था नागरिक श्री.ग्रामदैवत बुवाफन महाराज क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था श्री माऊली गुरुदत्त क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था कै पी के माने (सर) क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थेचे विशेष सहकार्य लाभत आहे.