पाण्यासाठी शिरोळकरांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Spread the love

मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन केले स्थगित

शिरोळ / प्रतिनिधी

 

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी गुरुवारी नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.एक दिवसआड व स्वच्छ पाणी पुरवठा न केल्यास दुषित पाणीआल्यास अधिकाऱ्यांना दुषित पाणी पाजण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

यापुर्वी नागरिकांनी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली होती.त्यानंतरही वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. गुरुवारी संभाजी चौक येथे नागरिक एकत्र आले त्यानंतर हा मोर्चा पालिकेवर आला.

 

 

त्याठिकाणी ठिय्या आंदोलन करुन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा व कोणत्याही गल्लीत दुषित पाणी आले.तर अधिकाऱ्यांना दुषित पाणी पाजण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.शहरात स्वच्छता होत नाही, दिड ते दोन कोटी रुपये स्वच्छतेवर खर्च होत असताना त्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.

 

 

यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी नागरिकांच्या समस्या निश्चितच दूर केल्या जातील. पाण्याचेही नियोजन केले जाईल पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी लाईट गेली तरी पर्यायी व्यवस्था म्हणून कृष्णा नदीवर जनरेटर नेऊन बसून आता आला आहे त्यामुळे जॅकवेलवर 24 तास पाणी उपसा सुरु राहून किमान एक दिवस आड पाणी येऊ शकेल.

 

त्याचबरोबर कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाली तर पाणी उपसा करायला आणखी एका तरफ्यावरील मोटरीची गरज होती.तीही मोटर नगरपरिषदने रात्रीत आणून त्याची आज ट्रायल पण घेतली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने औषध फवारणी सुरु झाली घंटागाडी दररोज येत आहे.दररोज गटारी साफ करून कचरा उचलण्यास सुरुवात झाले आहे आहे.तसेच जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी नगरपरिषद प्रशासन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले यामुळे टाळे ठोक आंदोलन स्थगित करण्यात आले.

 

सदर आंदोलनात धनाजी चुडमुंगे, महेश जाधव, कृष्णात गावडे, एकनाथ माने, शहाजी गावडे, शशिकांत काळे, राहूल माने, दिपक काळे, बाबू मोरे, अजित देशमुख यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.

error: Content is protected !!