कुरुंदवाड यात्रेची दीडशे वर्षाची परंपरा टिकुन – मदाळे

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

दीडशे वर्षाची परंपरा असणारी येथील यात्रा सर्वांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून पुढील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत भव्य यात्रा भरवण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन निश्चित करेल असे प्रतिपादन प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी केले.

 

येथील यात्रेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या व यात्रा समारोपाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते रामदास मधाळे होते.यावेळी लेखापाल आतिश काटकर ज्येष्ठ पैलवान बापू असंघे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

यावेळी कुरुंदवाड यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या गण शूटिंग,हस्तकला,कुस्ती,मॅरेथॉन,शेती जनावरे,बी-बियाणे आधी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेसह प्रशस्तीपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
स्वागत लेखापाल अतिश काटकर यांनी केले तर आभार अर्जुन पाटील यांनी मानले.

 

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते रामदास मधाळे म्हणाले कुरुंदवाडच्या यात्रेला दीडशे वर्षाची परंपरा आहे.ही परंपरा या वर्षीही टिकुन ठेवत यात्रा चांगल्या प्रकारे पार पडली असून पुढील वर्षी याहीपेक्षा भव्य यात्रा भरण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

 

या कार्यक्रमाला प्रदीप बोरगे, प्रणाम शिंदे,नयन जाधव, अविनाश गोरे,आनंदा शिंदे,सचिन थरकर,अमोल कांबळे, अभिजीत उर्फ वासू कांबळे,प्रसाद माने,शिवाजी कांबळे आदी मान्यवरासह नगरपालिका प्रशासनाचे सर्व कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!