हिंदुत्ववादी संघटनाच्यावतीने भगवंतेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री व पंचधातू मुकुट अर्पण

Spread the love

सेवाव्रत प्रतिष्ठान कोल्हापूर,विश्व हिंदू परिषद,बजरंग दल सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले विशाळगड येथे भगवंतेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री व पंचधातू मुकुट अर्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदुत्व तेथेच बंधुत्व या विचारातून प्रेरित होऊन श्री भगवंतेश्वर मंदिर विशाळगड येथे होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवासाठी भगवंतेश्वर महादेव मंदिरात पुलाची शिरोली येथील प्रशांत कागले विश्व हिंदू परिषद विशेष जिल्हा पदाधिकारी व हिंदूनिष्ठ कार्यकर्त्यांकडून पंचधातू मुकुट अर्पण करण्याचा सोहळा व महाशिवरात्री असा संयुक्त कार्यक्रम किल्ले विशाळगड येथे आयोजित करण्यात आला होता.किल्ले विशाळगड ता. शाहूवाडी येथील श्री भगवंतेश्वर मंदिर महाशिवरात्री यात्रा गेली ३८ वर्ष ही यात्रा होत आहे यात्रेची सुरुवात स्वर्गीय माधवराव चंद्रराव साळुंखे (दादा) विश्व हिंदु परिषद प्रांत उपाध्यक्ष यांनी माननीय दिलीप दादा भिवटे यांना घेऊन केली. सुरूवातीला चार पाच लोक घेऊन अतिशय संघर्षातून केली, स्वर्गीय माधवराव साळुखे यांनी धाडस,जिद्द ठेवून ह्याला उत्सवाचे स्वरूप आणून आजूबाजूच्या सर्व हिंदुत्वाद्याना एकत्र करून हे काम चालुच ठेवले. परिणामी विशाळगडावरील अस्तित्वहीन होत चाललेल भगवंतेश्वराचे मंदिर बांधून पुर्ण केले.व अनेक हिंदु मंदिरांना जिवंतपणा आला.अगदी दादांच्या शेवटच्या वेळेस डॉक्टरांनी मनाई करून सुध्दा पालखीतुन गडाची यात्रा,भगवंतेश्वर आशिर्वाद घेऊन पुर्ण केलीच,आणि एका महिन्याने दादांचे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले,,तत्पश्चात हे हिंदु कार्य त्यांचे सुपुत्र हिंदुनेता, जिवा महाल पुरस्कार विजेता संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे हे तत्पर पार पाडत आहेत.
आणि त्यांच्या पाठीशी असंख्य हिंदुत्वादी संघटना युवा कार्यकर्ते हे मोठ्या संख्येत उभा रहात आहेत..तर ह्या हिंदु कार्याचा सुरुवात शिरोली पुलाची मधे १८ वर्षापूर्वी हिंदुत्वादी कार्यकर्ते प्रशांत कागले (विश्व हिंदु परिषद बजरंग दल)यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन सुरवात केली व हे कार्य अविरतपणे चालु आहे.
यावेळी प्रशांत कावले निलेश शिंदे श्रीकांत कदम श्रीपाद रंगापुरे सतीश गेसुरकर आप्पासाहेब चव्हाण प्रतीक घोरपडे ऋषिकेश अबदार दीप कदम अजय मेणीकरे ओंकार भुसारी यश आगळे या सर्वांनी या सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले होते या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील कृष्णात करपे विजय जाधव योगेश खवरे भानुदास माळी साताप्पा भवान सतीश पाटील मधुकर पद्ममाई राजाराम करपे मधुकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

error: Content is protected !!