पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली सर्वेश्वर महादेव मंदिरा मध्ये पारंपारिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात
पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील सर्वेश्वर महादेव मंदिरामध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये व ओम नमः शिवाय मंत्राचे नामस्मरण धार्मिक विधी व शिवलीलामृत गण ग्रंथ पारायण दर्शनासाठी आसुसलेले भाविक महाशिवरात्री निमित्य भाविकात उत्साहाचे वातावरण व भारावलेल्या वातावरणात आज मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली पुलाची शिरोली येथील सर्वेश्वर महादेव मंदिरांमधील शिवलिंग सुमारे चारशे पन्नास वर्षा पूर्वीचे आहे करवीर महात्म्य मध्ये या शिवलिंगाचा उल्लेख केलेला आहे अशा पुरातन शिवलिंगास पहाटे पाच वाजता ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा गजर करत शिवलिंगास महा रुद्र अभिषेक त्यानंतर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करण्यात आला यानंतर शिवलीलामृत गण या ग्रंथाचे पारायण शिरोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच २०० लोकांनी शिवलीलामृत गण या ग्रंथाचे पारायण करण्यात आले यावेळी महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी शिरोली लोकनियुक्त महिला सरपंच सौ.पद्मजा करपे आल्या होत्या याचे अवाचित्य साधत मंदिर व्यवस्थापणाने सौ.करपे यांच्या हस्ते ग्रंथ पारायणास बसलेत्या भगीनीनां ग्रंथाचे वाटप मंदिरामध्ये करण्यात आले .
सायंकाळी सहा वाजता शिवलिंगास पुन्हा अभिषेक करण्यात आला त्यानंतर भजनाचा कार्यक्रम व रात्री बारा वाजता शिवलिंगास अभिषेक व शनिवारी सकाळी प्रसादाचे वाटप असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचे मंदिर व्यवस्थापक उत्तम पाटील महाराज व सर्वेश्वर महादेव मंदिर कमिटीने महाशिवरात्रीचे आयोजन केल्याचे सांगितले.मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई मंडप मंदिरामधील वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक सजावटीने सजलेली हे मंदिर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते . दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांची रांग लागली होती.यावेळी सरपंच सौ.पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी, ग्रा.पं.सदस्या सौ.सुजाता पाटील, सौ. अनिता शिंदे, सौ.धनश्री खवरे, सौ.मनिषा संकपाळ, हर्षदा यादव, महादेव सुतार,कृष्णत करपे, बाळासो पाटील, दिपक यादव, संदीप तानवडे ,सचिन गायकवाड , योगेश खवरे, विजय जाधव , जग्गनाथ पाटील, सतीश पाटील, संपत संकपाळ, उत्तम पाटील (महाराज), मधुकर पद्माई , निखिल पाटील, व इतर मान्यवर यांच्यासह भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.