शेतकऱ्यांनी शेतीतील मातीचे मूल्य ओळखणे गरजेचे – ऊस शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे

Spread the love

शेतकऱ्यांनी शेतीतील मातीचे मूल्य ओळखणे गरजेचे ऊस शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांचे प्रतिपादन

शिरोळ / प्रतिनिधी

शेतकऱ्यांनी शेतीतील मातीचे मूल्य ओळखून तिचे संगोपन केल्यास अधिक उत्पादन देण्यास माती केव्हाही तयार असते तेव्हा मातीला समजून घेतले पाहिजे शेती संशोधक तज्ञांच्या सल्ल्यानुसार शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे प्रतिपादन व्हि .एस.आय पुणे येथील माजी ऊस शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांनी येथे बोलताना केले.

 

जैन सांस्कृतिक भवन शिरटी येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता शिरटी किसान विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाश्वत ऊस शेती मार्गदर्शन शिबिरात श्री साळुंखे बोलत होते अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी कल्लाप्पा खवाटे हे होते.

आबासाहेब साळुंखे पुढे म्हणाले मातीचे लाईफ वाढवणे गरजेचे आहे मातीवरच शेती उत्पादन शक्य आहे मातीचा वास म्हणजे श्वास आणि ऑक्सिजन आहे.माती परीक्षण करून शेतीची मशागत केली पाहिजे.शेतातील माती कायम जिवंत ठेवली पाहिजे मातीकडे दुर्लक्ष करून भरम साठ पाणी आणि खताचा डोस देऊन काही साध्य होणार नाही असे सांगून ते म्हणाले शेतीला सेंद्रिय खता शिवाय पर्याय नाही किती रासायनिक खताचा मारा केला.

 

 

तरी सेंद्रिय खताचा डोस आवश्यक आहे.खड्ड्यामध्ये खत तयार करणे फायदेशीर ठरते असे सांगून त्यांनी रासायनिक खताचा डोस पाण्याची मात्रा बियाणे कोणती आणि कशी घ्यावीत उसाच्या सरीस मधील किती अंतर असावे सरी मध्ये किती खोली असावी का नसावी ठिबक सिंचन तसेच क्षारपड जमीन सुधारणा केल्याने शिरटी गावातील शेतकऱ्यांचे कौतुक केले.प्रारंभी स्वागत रामगोंडा पाटील यांनी केले.

 

 

तर प्रस्ताविक संस्थेचे सेक्रेटरी रमेश चौगुले यांनी केले.शास्त्रज्ञ साळुंखे यांचा परिचय राहुल चौगुले यांनी दिला.यावेळी संस्थेचे चेअरमन संगीता भोसले,व्हा चेअरमन रमेश कुंभार,संचालक अनिल ढेकळे,विश्वास कांबळे,अजित टारे,महावीर दानोळे,रामचंद्र बंडगर,प्रदिप पाटील,बाबासो चौगुले,सागर मगदुम,संचालिका लता रोजे,

 

 

प्रगतशील शेतकरी जयपाल शिरगावे अशोक चौगुले, हसुरचे नेमगोडा पाटील,मलगोडा पाटील,बाळासाहेब पाटील,आणि शिरटी,हसुर,कुटवाड,नृसिंहवाडी,बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.या कार्यक्रमास धवल कृषी सेवा केंद्र व रत्नदिप कृषी सेवा केंद्र शिरटी याचे मोलाचे सहकार्य लाभले,शेवटी आभार रमेश चौगुले यांनी मानले.

error: Content is protected !!