शिरोळ / प्रतिनिधी
येथील रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलीयंट इंग्लिश मिडीयम स्कुल या शाळेमध्ये “विज्ञान व बहुविध कौशल्य” या संबधीत प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले. या प्रसंगी ते म्हणाले कि आजचा विदयार्थी हा उपक्रमशील असावा.
त्याच प्रमाणे जीवनामध्ये विज्ञान दृष्टीकोन जोपासणारा असावा या दोन्ही गोष्टी ब्रिलीयंट इंग्लिश मेडियम स्कुलच्या विदयार्थ्यामध्ये असल्याचे या प्रदर्शनामध्ये दिसून येते. या वेळी विद्यार्थ्यांनी जीवनाशी निगडीत जे विज्ञान आहे त्यावर आधारित प्रोजेक्ट या प्रदर्शनासाठी तयार केले होते. इलेक्ट्रोनिक इलेक्ट्रीसिटी,शेती जीवशास्त्र भैतिकशास्त्र व रसायनशास्त्र, व अंतराळशी निगडीत प्रोजेक्ट व त्यांचे प्रात्यक्षिक प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी करून दाखवली या सर्वांचे कौतुक मोहन माने यांनी केले.
संस्थेच्या संचालिका सौ, स्वाती माने म्हणाल्या कि भविष्यात अश्या उपक्रमातून या शाळेचा विद्यार्थी इस्त्रो सारख्या संस्थेत कार्यरत असेल विद्यार्थ्यांच्या कल्पकबुद्धीचे कौतुक केले व यापुढे हि शाळा प्रत्येक क्षेत्रात ज्ञान देण्यासाठी तत्पर राहिल व शाळेचा व विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील राहील असे मात व्यक्त केले.
विज्ञान प्रदर्शनासाठी सुपरवायझर सौ.शहनाज शेख व सौ. ज्योती बरगाले व इतर शिक्षकांनी आयोजन केले, शाळेचे प्राचार्य पी.एस.काकडे यांनी मार्गदर्शन केले.