स्वातंत्र्यसेनानी दौलतरावजी निकम जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Spread the love

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी,माजी आमदार स्व.दौलतराव निकम यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना ‘स्वातंत्र्यसेनानी दौलतरावजी निकम जीवनगौरव पुरस्कार’ वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता व्हन्नूर येथे संपन्न होत आहे.

 

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री, पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ,आमदार सतेज उर्फ बंटी पाटील,माजी आमदार संजयबाबा घाटगे व शिक्षक आमदार जयंत आसगावकर उपस्थित राहणार आहेत.
तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने,गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील,दलित मित्र एस.आर.बाईत व नैसर्गिक शेती विज्ञान मंडळाचे अध्यक्ष एम.आर.चौगुले उपस्थित राहणार आहेत.

 

 

या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते कौन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते रामचंद्र सारंग,मुख्याध्यापक संघ कोल्हापूरचे माजी अध्यक्ष बी.जी.काटे,भारती विद्यापीठाचे संस्थापक कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, यशस्वी उद्योजक नारायणराव जाधव,समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी,सेवानिवृत्त शिक्षक व बिद्री साखर कारखान्याचे संचालक एस.बी.पाटील व यशस्वी उद्योजक गणपतराव जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

 

तरी या समारंभास अगत्यपूर्वक उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थाध्यक्षा श्रीमती सुनंदा निकम,संस्था सेक्रेटरी यशवंतराव निकम,जन्मशताब्दी समितीचे सचिव व्ही.जी.पोवार व सर्व सदस्य स्वर्गीय दौलतरावजी निकम जन्मशताब्दी समिती यांनी केले आहे.

error: Content is protected !!