जागतिक महिला दिनानिमित्त नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिराचे आयोजन

Spread the love

नृसिंहवाडी / प्रतिनिधी

महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून वातावरणातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची बनली आहे.आरोग्यविषयक शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घ्यायला हवा. महिला सशक्तीकरणा संदर्भात गरोदर मातांमध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन शिरोळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर यांनी केले.

 

 

नृसिंहवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ.पांडुरंग पाखरे व उपसरपंच रमेश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.या आरोग्य शिबिरामध्ये एकूण 121 महिलांनी सहभाग घेतला.

 

 

यावेळी आरोग्यासंदर्भातील विविध तपासण्या करण्यात आल्या. उपस्थित महिलांना डॉ.खटावकर यांनी आरोग्य व आहाराच्या सवयी याबाबत मार्गदर्शन केले.डॉ.पाखरे यांनी उपस्थित महिलांना निरोगी जीवनाबाबत मार्गदर्शन केले. योग प्रशिक्षक श्रीम करमरकर यांनी योग सत्रात विविध प्रात्यक्षिके करवून घेतली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.डी.यमाटे,डॉ.सम्मेद पाटील,डॉ.अक्षय सूर्यपेठ यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे स्वागत दिनकर तराळ यांनी केले.आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर दुबुले यांनी केले.यावेळी दादासो आवताडे,संदीप सरंजामे यांच्यासह मोठ्या संख्येने आरोग्य सेवक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ्,औषध निर्माण अधिकारी,गट प्रवर्तक,आशा स्वयंसेविका,परिचर उपस्थित होते.

error: Content is protected !!