शेतीत योग्य व काटेकोर नियोजनातून साधले विक्रमी उत्पादन
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावातील प्रगतशील शेतकरी व आदर्श, उत्कृष्ट शेतकरी पुस्कार विजेते आण्णासो कुरूंदवाडे यांची गावामध्ये २ एकर शेती आहे. त्यात १ एकर ऊस व एक एकर केळी पिक असून, यामध्ये CO-८६०३२ या वाणाचा प्रामुख्यतः व कळी मध्ये G-9 या वाणाचा वापर लागवडीसाठी करतात. तसेच कुरुंदवाडे हे गावातील १० एकर शेती करायल घेतली असून त्यामध्ये या पिकांची लागवड करुन उत्तम उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले आहेत.त्यांना शेतीमध्ये त्यांचे कुंटूब मदत करते. त्यात अमर व राम या मुलांच्या सहकार्याने ते शेती यशस्वीरित्या पार पाडतात.अमर यांचे १० वी व राम याचे बी.एसी ॲग्री चे शिक्षण घेतले आहे. सातत्याने शेतीमध्ये प्रयोग करण्याच्या मानसिकतेतून शेती फायदेशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न राहायला आहे.
व्यवस्थापनातील विशिष्ट बाबी
१) पिक फेरपालाट
२) सेंद्रिय खतांचा वापर
३) रासायनिक खतांचा योग्य
व व्यवस्थितरित्या वापर
४) ज्या रानात पीक घ्यायचे आहे त्यामध्ये शेणखतांचा अधिक वापर
५) काटेकोर व योग्य नियोजन
सेंद्रिय खतांचा शेतीमध्ये वापर
१) ऊस पीक झाल्यानंतर जामीनीची खोल मशागत व रानाला विश्रांती दिली जाते.
२) हंगामानुसार भाजीपाला पिकांची लागवड, पीक फेरपालाटसाठी फायदेशीर ठरते.
३) एकरी ७-१० टॉली शेणखताचा वापर.
४) जिवांमृत व संजीवकांचा वापर.
उत्पादन व व्यवस्थापन यांचा समतोल
ऊस
“जसे आपले व्यवस्थापन तसे आपले उत्पादन” यानुसार कुरूंदवाडे उस पीकामध्ये CO-८६०३२ या जातीचा लागवडीसाठी, तसेच ‘सुपरकेन नर्सरी’ याचा वापर अलीकडील काळात ते करत आहेत.
१) एक डोळा कांडीचा वापर,लागवडीतील अंतर ४×१.५ फुट व ठिबक सिंचनाचा वापर केला जातो.
२) बेसल डोसपासून ते बीज प्रकीया यांचा ते व्यवस्थित अवलंब करतात.
३) विद्राव्य खतांची फवारणी,आळवणी यांचा ठिबकाद्वारे पीकांना महीन्यातून दिला जातो.
४) एकरी ५०-६५ हजार रुपये कमाल खर्च होतो असे कुरुंदवाडे सांगतात.
५) एकरी १००-१०५ टनापर्यंत उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले आहेत.
केळी
१) कुरूंदवाडे G-9 या वाणाचा वापर लागवडीसाठी करतात.
२) शेताची योग्य प्रकारे मशागत करून एकरी ८-१० ट्रॉली शेणखताचा वापर ते करतात.
३) यामध्ये ७×५ मी. अंतराने सरी सोडून केळी रोपांची लागवड केली जाते.
४) सरासरी १२५०-१३०० रोपांची एकरी लागवड केली जाते.
५) याशिवाय झाडांना दोन्ही बाजूला ठिबक टाकून पाण्याचे उत्तम नियोजन केले जाते.
६) महीन्यातून ३-४ वेळा विद्राव्य खतांची ठिबकाद्वारे आळवणी करण्यात येते.
७) प्रती १००० रोपला सुरवातीच्या काळात:
१२:६१:००-२ किलो
००:५०:००- २ किलो
युरिया – ५ किलो
मॅग्नेशियम सल्फेट – ७००ग्रॅम
पोटॅश- ३ किलो
हे सुरवातीच्या काळात दिले जाते.
तसेच कॅल्शियम नायट्रेट + कोंबी हे महीन्यातून एक वेळा घड येई पर्यंत.
घड पडल्यानंतर / आठवड्यातून दोन वेळा
१२:६१:००-२ किलो
००:००:५० -२ किलो
१३:००:४५-२ किलो
युरिया -२ किलो
तसेच जिवानू, NPK २ लिटर दोन महीन्याच्या अंतराने.
९) पिक वाढीच्या काळात योग्य प्रमाणात खांताची मात्रा दिली जाते
१०) १० व्या महीन्यात २-लिटर पोटॅशचा वापर केला जातो. अश्या प्रमाणे एकरी ४०-४२ टनापर्यंत केळी पिकाचे उत्पादन घेतले जाते.
मिळालेले पुरस्कार
१) दत्त सहकारी साखर कारखाण्याचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार.
२) सकाळ मार्फत उत्कृष्ट शेतकरी पुस्कार
आण्णासो कुरुंदवाडे यांना इतरत्र मिळालेले मार्गदर्शन
१) शेती कार्यशाळा मध्ये उत्स्फूर्त सहभाग.
२) कृषि विद्यापीठ अंर्तगत पिक मार्गदर्शन कार्यक्रमात सहभाग
३) सचिन पाटील व सुरेश मगदूम यांचा केळी,ऊस व अन्य भाजीपाला पीकासाठी नियमित सल्ला.
४) ॲग्रोवनचे नियमित वाचन.
आण्णासो कुरूंदवाडे यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर शेतकऱ्यांनी देखील विक्रमी उत्पादन घ्यावे असे आवाहन.