हेरवाड मध्ये महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न.
हेरवाड / प्रतिनिधी
हेरवाड ग्रामपंचायत यांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला.महिला दिनाच्या निमित्ताने फूड स्टॉल,फनी गेम्स व खेलो इंडियामध्ये रौप्यपदक मिळवून हेरवाड गावचा नावलौकीक केल्याबद्दल कु.भूमिका राजेंद्र मोहिते तर कुस्तीमध्ये विद्यापीठ खेलो इंडिया गेम्स मध्ये कांस्यपदक मिळविल्याबद्दल कु.श्रावणी ज्ञानेश्वर शेळके यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच रेखा जाधव व महिला सदस्या यांचे शुभहस्ते झाले.तर खाद्यपदार्थ स्टॉलचे उद्घाटन ग्राम विकास अधिकारी पल्लवी कोळेकर व रेखा देशमुख यांचे हस्ते झाले.
डॉ.उमा जाधव,शिवसेना महिला आघाडीच्या मंगला चव्हाण यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच रेखा जाधव यांनी महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेवून महिलांना शुभेच्छा दिल्या.
हायस्कूल व कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी सुंदर नृत्याविष्कार सादर केला.महिलांच्यासाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाज जमादार,सुवर्णा अपराज,माजी सरपंच चंद्रकला पाटील,शोभा पाटील,कल्पना मस्के यांचेसह ग्राम पंचायत सदस्य,महिला उपस्थित होत्या.
प्रास्ताविक शुभांगी पोवार यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तातियाना माने यानी केले.तर वैशाली पाटील यांनी आभार यांनी मानले.